पारगाव येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या गुटख्याचा दोन साठ्यावर छापा टाकुन एकुण ९१ हजार ८४६ रुपये किमतीचा बंदी असलेला विविध कंपन्यांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. मंचर पोलिसांना पारगाव येथील लबडेमळा येथे गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्री, वाहतुक, साठा, उत्पादन, वितरण या करीता प्रतीबंध केला असतानाही बेकायदेशीररित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, पोलिस हवालदार नवनाथ नाईकडे, पोलीस नाईक निलेश खैरे, पोलीस जवान सुर्दशन माताडे यांनी काल शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला असता राहुल गहिनीनाथ कापडी (वय २२ रा. लबडेमळा) याच्याकडे बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने दोन मोठ्या बारदान गोण्यामध्ये एकुण ७८ हजार ३४ रुपये किंमतीचा विविध कंपन्याचा गुटखा, पानमसाला तंबाखुजन्य पदार्थ जवळ बाळगुन विक्री करीत असल्याचे आढळले. पारगाव येथेच दुसऱ्या केलेल्या कारवाईमध्ये शिंगवे रस्त्यावरील संगम हार्डवेअर दुकाणामध्ये मध्ये गणेश शिवाजीराव लोंढे (वय ३६ रा पारगाव ) याच्याकडेही बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेला १३ हजार ८१२ रुपये किंमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा आढळुन आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. त्यामुळे राहुल कापडी व गणेश लोंढे यांच्या विरुध्द सरकारतर्फे पोलिस हवालदार नवनाथ नाईकडे व व्ही. बी वाघ यांनी कायदेशिर फिर्याद दिली आहे.
मंचरला ९२ हजारांचा गुटखा जत्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST