राजाराम लोंढे - कोल्हापूर -राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे ५० टक्के अनुदानावर ४० शेळ्या गटांचे वाटप करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच ही योजना सुरू करण्यात आली असून, राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट कोल्हापूरला ४८ गटांचे दिले आहे. एका गटासाठी ५० टक्के म्हणजे साधारणत: दीड लाख रुपये अनुदान प्रस्तावित आहे. राज्य शासनाच्या वतीने नावीन्यपूर्ण योजनेतून दहा शेळ्या व एक बोकड ही योजना ५० टक्के अनुदानावर सुरू आहे. त्याचबरोबर विशेष घटक योजनेतून मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठीही शेळ्यांचे गट दिले जातात; पण राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेळी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या वर्षी २५ जिल्ह्यांतील १४९ तालुक्यांनाच उद्दिष्ट दिले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश नव्हता; पण यंदा अकोला, वाशीम व मुंबई वगळता सर्वच ३३ जिल्ह्यांत ६६० शेळी गटांचे वाटप केले जाणार आहे. सर्व प्रवर्गातील बेरोजगार लाभार्थ्यांना या प्रकल्पातंर्गत लाभ मिळणार आहे. ४० ठाणबंद शेळ्या व दोन बोकड खरेदीसाठी ५० टक्के अनुदान महामंडळातर्फे लाभार्थीला दिले जाणार असून, त्यासाठी निवारा उभारण्यासाठी तीन गुंठे स्वत:ची जागा असणे बंधनकारक आहे. लाभ घेतल्यानंतर कमीत-कमी पाच वर्षे हा व्यवसाय करणे बंधनकारक आहे. जिल्हातालुकेगटांची संख्याअनुदान (लाख)पुणे २८१२सातारा७ २८४२ सांगली३९१३.५०सोलापूर१४६नाशिक २८१२ धुळे १ ४ ६ नंदूरबार२ ८ १२ जळगाव८ ३१४६.५० अहमदनगर ४१६२४औरंगाबाद३१२१८ जालना६२४३६ परभणी७२८४२ राखीव कोटालाभार्थी निवडताना ३० टक्के महिला लाभार्थींना प्राधान्य मिळणार आहे. त्याचबरोबर तीन टक्के विकलांग लाभार्थींनाही संधी दिली जाणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पासारख्या व तत्सम योजनेतून लाभ घेतलेल्यांना या योजनेतून लाभ घेता येणार नाही.
५० टक्के अनुदानावर होणार ४० शेळ्यांचा गट
By admin | Updated: September 8, 2014 00:13 IST