शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

काजव्यांचा लखलखाट तारे जमीं पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:31 IST

काजवे लुकलुक करून झाडांवर बसलेल्या माद्यांना संदेश पाठवतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिसणारे हे दृश्य अतिशय अविस्मरणीय असते.

ठळक मुद्देहरिश्चंद्रगड, माळशेज, नानेघाट,भीमाशंकर, माथेरानपासून पश्चिम घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये काजव्यांचा वावर

भीमाशंकर : सहयाद्रीच्या डोंगरदऱ्यांमधील झाडे सध्या चमचम करीत आहेत. ती चमचम कृत्रिम लाईटची नसून ‘काजव्यांच्या’ प्रकाशाने झगमगणाऱ्या झाडांची आहे. आकाशातील तारांगण जणू जमिनीवर भेटायला आल्याची अनुभूती हे काजवे चमकताना पाहून वाटते. पक्षी वसंत ऋतूत गाऊन माद्यांना आकर्षित करतात, तसे काजवे लुकलुक करून झाडांवर बसलेल्या माद्यांना संदेश पाठवतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिसणारे हे दृश्य अतिशय अविस्मरणीय असते. इमारतींवर सोडलेल्या लाईटच्या माळा जशा चमकतात, तसे हे हजारो काजवे लुकलुक  करत फिरतात. आकाशातील ‘तारांगण’ जसे दिसते तसे हुबेहूब दृश्य दिसत असते. जणू तारांगणच जमिनीवर भेटायला आल्यासारखे वाटते. सध्या हे सुंदर दृश्य पश्चिम घाटात पाहावयास मिळत आहे. भंडारदरापासून हरिश्चंद्रगड, माळशेज, नानेघाट, आहुपे, भीमाशंकर, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरानपासून पश्चिम घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये हे काजवे चमकताना दिसत आहेत. थोडा जास्त पाऊस सुरू झाल्यावर काजव्यांची ही चमचम थांबून जाते. अशा प्रकारे काजवे चमकणे म्हणजे चांगल्या निसर्गाचे निर्दशक आहेत. जर देशी झाडांऐवजी विदेशी झाडांची लागवड वाढली, देशी झाडे तुटली, जंगलांमध्ये वाढता माणसांचा वावर , वाहतूक, नागरीकरण यामुळे भविष्यात हे दृश्य कितपत दिसेल याबद्दल साशंकता आहे . ज्या ठिकाणी माणसाचे आक्रमण कमी आहे, अशा ठिकाणी लक्षावधींच्या संख्येने हे काजवे दिसतात. इंग्रजीमध्ये या क्रियेला ‘ग्लोवॉर्म’ म्हणजेच प्रकाशमयआयु असे म्हणतात. हे दृश्य म्हणजे न बोलता प्रकाशाची भाषा आहे.  .................‘या कुंजातून त्या कुंजातून,  इवल्याशा या दिवट्या लावून, मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळत वनदेवी ही’ बालकवींची फुलराणी कवितेत अशा प्रकारे काजव्यांचा खूप छान उल्लेख केला आहे. अनेक हिंदी-मराठी कवींनी काजव्यांवर गाणी लिहिली आहेत. जुगनू नावाचा सिनेमादेखील झाला आहे.      

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरJunnarजुन्नर