कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, सुरेश मेहेर, माजी नगरसेवक शेखर पाटील, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत यांनी भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन भाऊंना अभिवादन केले.
इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य नागनाथ ढवळे, मुख्याध्यापक विकास फलफले, प्रा. रवींद्र साबळे , कैलास कदम यावेळी उपस्थित होते. यावेळी दादासाहेब जावीर आणि त्यांच्या सहकारी मित्र व बालचमूंनी भक्तिगीते म्हणून भजन सादर केले. यावेळी कर्मयोगी परिवारातील सर्व सदस्य तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर येथे कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या समाधिस्थळावर अभिवादन करताना मान्यवर.