शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा निसर्ग हा भवतीने....गीत गा रे...

By admin | Updated: July 28, 2014 05:29 IST

पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...!

अशोक खरात, खोडदहिरवा निसर्ग हा भवतीने...जीवन सफर करा मस्तीने...मन सरगम छेडा रे... गीत गा रे जीवनाचे...धुंद व्हा रे...!पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...! सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ... हिरवळीत अधूनमधून डोकं वर काढून वाऱ्याच्या तालावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले... उंचचउंच काळ्याभिन्न कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे... स्वर्गरूपी निसर्गाच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणारे काही विकृत पर्यटक... असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, अशा सौंदर्यप्राप्त माळशेज घाटाचा इतिहास किंवा त्याची भौगोलिक व नैसर्गिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.माळशेज घाटाच्या इतिहासाविषयी माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणाले, की माळशेज घाटाला शेकडो वर्षांचा इतिहास असून, प्राचीन महामार्गातील एक महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून माळशेजचे महत्त्व आहे. सातवाहनकाळात पैठण (प्रतिष्ठाण) ही राजधानी भरभराटीला येत होती. त्याचबरोबर बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारातही वाढ होत होती. दोन हजार वर्षांपूर्वीची ही व्यापारी पद्धत अभ्यासनीय आहे. पश्चिमेकडून रोम, भूमध्य समुद्र प्रदेशातील व्यापारी आपली जहाजे घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरावर आपापला विविध प्रकारचा माल घेऊन उतरत असत. चौल, सोफारा, कल्याण, दाभोळ व वरच्या बाजूला भडोच येथील बंदरावरून अशा व्यापाऱ्यांची गर्दी असायची, मग तेथून हा माल बैलगाड्या, खेचरे, घोडे यावर लावून देशाच्या विविध भागांत पोहोचविला जायचा. पण कोकणातून देशावर येण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागत. पण तरीही त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी सह्याद्रीमध्ये अनेक घाट प्रचलित केले. त्यापैकीच हा आपला आवडता माळशेज घाट...!