शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

गंगापूर-आपटी रस्त्याला हिरवा कंदील

By admin | Updated: September 17, 2016 01:20 IST

स्वातंत्र्यापासून रस्त्यासाठी वंचित असलेल्या गंगापूर-आपटी रस्त्याला वनविभागाने परवानगी दिली आहे. हा रस्ता व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ करत होते

घोडेगाव : स्वातंत्र्यापासून रस्त्यासाठी वंचित असलेल्या गंगापूर-आपटी रस्त्याला वनविभागाने परवानगी दिली आहे. हा रस्ता व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ करत होते. यासाठी रास्ता रोको, आंदोलने पण झाली होती. आंबेगाव तालुक्यात उंच डोंगरावर सुमारे एक हजार फूट उंचीवर वसलेल्या या गावात ७० कुटुंबे असून सुमारे ३५० लोकसंख्या आहे. या गावाकडे जाणारा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्यांच्या हरकतीमुळे हा रस्ता रखडला होता. आपटी गावाला रस्ता नसल्यामुळे हे गाव विकासापासून वंचित राहिले होते. आजारी, महिला असो किंवा बाळंतपणाची महिला, लहान मुले किंवा वयोवृद्ध माणसे यांना आजारपणात झोळीत टाकून आणण्याशिवाय पर्याय नव्हाता. दररोज या लोकांना कोणत्याही कामासाठी डोंगर चढावा व उतरावा लागत आहे. रस्ता नसल्यामुळे गावांमध्ये शासकीय योजना राबविण्यात मोठी अडचण होत होती. तसेच या गावची लोकसंख्याही कमी होऊ लागली होती. आरोग्य, शिक्षण, कुपोषण याचा मोठा परिणाम या गावावर झाला.येथील ग्रामस्थांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे रस्ता मंजुरीसाठी मागणी केली. सदर कामाच्या मंजुरीच्या दृष्टीने वळसे पाटील यांनी अनेक वेळा बैठका घेऊन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता मंजूर झाला असून, वनविभागाने दिलेल्या अटी व शर्तींची लवकरच पूर्तता करून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय गवारी यांनी दिली. सन २००५मध्ये या रस्त्यासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले; मात्र काम सुरू झाल्याबरोबर वनविभागाने हरकत घेऊन ते बंद पाडले. त्यानंतर रस्ता मंजुरीसाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र वनविभागाच्या कायद्यात झालेल्या बदलामुळे प्रस्ताव रखडला होता. दि. २८ मे २०१३ रोजी पुन्हा नव्याने कायद्यातील तरतुदी पाहून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. भोपाळ व नागपूर येथील वनविभागाच्या कार्यालयांमधील कागदपत्रांमधील त्रुटी दूर झाल्यानंतर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी या रस्त्याला तीन हेक्टर जागा देण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन उपअभियंता एस.बी. देवढे यांनी दिली. (वार्ताहर)