शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आंतराष्ट्रीय पातळीवर विधी क्षेत्रात मोठ्या संधी - उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:34 IST

‘‘आज देशभरातच नव्हे, संपूर्ण जगात कायद्याची व्याप्ती अधिकाधिक वाढत आहे. समाजाला कायद्याची परिणामकारकता व प्रभाव वाढविणाऱ्या विधी सल्लागारांची आवश्यकता आहे.

पौड : ‘‘आज देशभरातच नव्हे, संपूर्ण जगात कायद्याची व्याप्ती अधिकाधिक वाढत आहे. समाजाला कायद्याची परिणामकारकता व प्रभाव वाढविणाऱ्या विधी सल्लागारांची आवश्यकता आहे. त्यामुळे बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत,’’ असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी (कासारआंबोली) येथील अ‍ॅड. राम धुमाळलिखित ‘विधी क्षेत्रातील शिक्षण व करिअर’ या पुस्तकाचे प्रकाशन अ‍ॅड.निकम यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. ए. पाटील, सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, सिंहगड विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एच. जी. कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागप्रमुख दुर्गांबिनी पटेल, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, माजी खासदार नानासाहेब नवले, अशोक मोहोळ, आत्माराम कलाटे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे, अल्पना वरपे, सभापती कोमल वाशिवले, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, बाळासाहेब बोडके, सुभाष अमराळे, शांताराम इंगवले, नानासाहेब शिंदे, रवींद्र कंधारे, रामचंद्र दातीर, सुनील वाडकर, राम गायकवाड, स्वाती ढमाले, सुनील आमले, बाळासाहेब अमराळे, विलास अमराळे उपस्थित होते.निकम म्हणाले, की आज आयटीसारख्या करिअरच्या अनेक नवीन पर्यायाकडे नवी पिढी व पालक आकर्षित होताना दिसतात. मात्र, समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विधी शाखेची मात्र उपेक्षाच होताना दिसत आहे. राम धुमाळ म्हणाले, की ग्रामीण भागातील विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून हे परिपूर्ण पुस्तक लिहिलेले असून, तंत्रज्ञानामुळे विधी क्षेत्रात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.