शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापनदिनानिमित्त जवानांचे शानदार संचलन; शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:24 IST

सकाळच्या कडाक्याच्या थंडीत...उगवत्या सुर्याला साक्षी ठेवत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्याची भावना उरी बाळगून बॉम्बे सॅपर्सच्या जवानांनी बीईजीच्या परेड ग्राऊंडवर शानदार संचलन केले.

ठळक मुद्देबॉम्बे सॅपर्सचा १९८व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनयुद्धामध्ये लष्कराला वेगाने पुढे जाण्यासाठी मोठी भूमिका बीईजीचे जवान बजावतात : अंबू

पुणे :  सकाळच्या कडाक्याच्या थंडीत...उगवत्या सुर्याला साक्षी ठेवत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्याची भावना उरी बाळगून बॉम्बे सॅपर्सच्या जवानांनी बीईजीच्या परेड ग्राऊंडवर शानदार संचलन केले. यावेळी युद्धात शहिद झालेल्या जवानांना मान्यवरांनी मानवंदना वाहिली.बॉम्बे सॅपर्सचा १९८व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी झालेल्या शानदार संचलनाने या सोहळ्याची सांगता झाली. लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सीमईच कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकल म्यॅथ्यूज, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, बीईजीचे कमांडंट ब्रिगेडिअर धीरज मोहन यावेळी उपस्थित होते. परेड कमांडट म्हणून कर्नल अजित सागरे आणि अभिजीत पवार यांनी संचलन सोहळ्याचे नेतृत्व केले. सुरूवातीला देवराज अंबु यांनी संचलन सोहळ्याची पाहणी केली. यानंतर परेड सुरू करण्यात त्यांनी परवानगी दिली. लष्कराच्या बॅडपथकाच्या वाद्यावर शिस्तबद्ध वातावरणात बीईजीच्या ६ तुकड्यांनी संचलनाला सुरूवात केली. या परेड सोहळ्यात  मराठा लाईट इन्फन्ट्री, शिख रेजीमेंट तसेच बीईजीमध्ये दाखल झालेल्या जवानांनी सहभाग घेतला. यावेळी देवराज अंबू म्हणाले, बीईजीच्या जवानांनी आपल्या प्राणाची आहूती देऊन देशसेवा केली आहे. बीईजीला मोठा इतिहास आहे. युद्धामध्ये लष्कराला वेगाने पुढे जाण्यासाठी मोठी भूमिका बीईजीचे जवान बजावत असतात. या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व जवानांना तसेच त्यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

टॅग्स :Puneपुणे