शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा, उद्योग क्षेत्राला ग्राफेन देणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 03:39 IST

ऊर्जा, बांधकाम क्षेत्र, प्लॅस्टिक, विमान बांधणी, पादत्राणे, रोबोटिक, इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी आणि वाहनांचे सुटे भाग अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘ग्राफेन’च्या वापरामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत.

पुणे : ऊर्जा, बांधकाम क्षेत्र, प्लॅस्टिक, विमान बांधणी, पादत्राणे, रोबोटिक, इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी आणि वाहनांचे सुटे भाग अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘ग्राफेन’च्या वापरामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि आयुष्य वाढणार आहे. व्यावसायिक स्तरावरील वस्तूंच्या संशोधनाबाबत पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन रिसर्च (आयसर) ही संस्था ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठाला मदत करणार आहे.आयसर आणि मँचेस्टर विद्यापीठामध्ये याबाबतचा परस्पर सामंजस्य करार (एमओयू) झाला असून, त्याचे हस्तांतर मंगळवारी शहरात आयोजित कार्यक्रमात झाले. ब्रिटनच्या मुंबईतील उपउच्चायुक्त कार्यालयातील उपगुंतवणूक प्रमुख विल्यम हॉपकिन्स, दक्षिण आशियाई देशातील व्यापार आयुक्त क्रिस्पिन सायमन, डेव्हिड हिल्टन, डॉ. पॉल वायपर, आयसरचे संजीव गलांडे, डॉ. अरुण प्रकाश या वेळी उपस्थित होते.ग्राफाइटपासून तयार करण्यात आलेल्या ‘ग्राफेन’ या पदार्थामुळे उद्योगामध्ये मोठे बदल होणार आहेत. मोबाइल, वॉटर प्युरिफायर, विमान उद्योग, पेंटिंग, कुकिंग, टेक्सटाईल, वाहनांचे टायर, बल्ब यामध्येदेखील याचा वापर करता येईल. त्यामुळे उत्पादनांचे आयुष्य वाढणार आहे. ‘ग्राफेन’च्या मदतीने वाहनांमधील वापरल्या जाणाऱ्या बॅटरीचा चार्जिंग कालावधी कमी होईल. बांधकाम क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिटचे आयुष्य वाढण्याबरोबरच सिमेंट ब्लॉकचे वजनही कमी होईल. यापासून तयार केल्या जाणाºया प्लास्टिकचा संपूर्णत: पुनर्वापर करता येईल. देशभरातील १३० हून अधिक उद्योगांनी या तंत्रज्ञानामध्ये रस दाखविला आहे. त्यापैकी ९० कंपन्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्याची तयारीदेखील केली असल्याचे डॉ. प्रकाश यांनी सांगितले.‘ग्राफेन’च्या मदतीने तयार करण्यात आलेला बल्ब, वाहनातील काही सुटे भाग, सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक, शूज, प्लास्टिक अशा विविध वस्तूदेखील कार्यक्रमात पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसाय