पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक २०२०चा कार्यक्रम घोषित झाला आहे. सदर निवडणुकीचे मतदान मंगळवार दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते सायकांळी ५ पर्यंत होणार आहे. मतमोजणी गुरूवार, ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त आहेत. मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे. सदरची रजा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, अन्वये अनुज्ञेय असणार आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रजा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST