शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

तीन वर्षांपासून रखडले ‘ठिबक’चे अनुदान

By admin | Updated: January 5, 2016 02:33 IST

ठिबक सिंचन करा, अशी सक्ती एकीकडे शासन शेतकऱ्यांना करीत आहे; मात्र ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान तीन-तीन वर्षे रखडवत आहे.

सोमेश्वरनगर : ठिबक सिंचन करा, अशी सक्ती एकीकडे शासन शेतकऱ्यांना करीत आहे; मात्र ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान तीन-तीन वर्षे रखडवत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सन २०१२-१३ व २०१४-१५मध्ये ठिबक केलेल्या ३ हजार शेतकऱ्यांचे ९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना राज्य सरकार ठिबक करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. शेतकरी मात्र, पदरचे पैसे गुंतवून शेतामध्ये ठिबक सिंचन योजना राबवीत आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना तीन-तीन वर्षे अनुदानच दिले २२जात नाही. एकट्या बारामती तालुक्यात सन २०१२-१३मधील ४३६ शेतकऱ्यांचे १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान थकीत आहे. तर, सन २०१३-१४चे ३०० शेतकऱ्यांचे ७० लाख व सन २०१४- १५चे ३४० शेतकऱ्यांचे ७२ लाख रुपये अनुदान देणे थकीत आहे. हा आकडा जिल्हास्तरावर तब्बल ९ कोटींच्या घरात जातो. जिल्ह्यातील सन २०१२-१३ या वर्षात ठिबक सिंचन राबविलेल्या शेतकऱ्यांपैकी १,२०० शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचे ३ कोटी ६५ लाख रुपये देणे बाकी आहे. तर, सन २०१४-१५मधील ठिबक केलेल्या शेतकऱ्यांपैकी १,८०० शेतकरी ५ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत. आघाडी सरकारच्या काळात ठिबकवरील ठरलेल्या अनुदानापैकी ८० टक्के केंद्र सरकार व २० टक्के राज्य सरकारने अदा करण्याचे सूत्र ठरलेले होते. मात्र, आता भाजपा सरकारच्या काळात हे सूत्र ५०-५० वर आले. (वार्ताहर)