शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लडबाजांना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पावले उचलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 14:07 IST

४० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले पळसदेव येथील ऐतिहासिक पळसनाथ मंदिर उघडे पडले आहे...

ठळक मुद्देसुुरक्षारक्षक तैनात करणार : पळसनाथ मंदिर परिसरात सूचनाफलकऐतिहासिक पळसनाथ मंदिर यादवकालीन असून, हेमाडपंती शैलीतील

इंदापूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ मंदिर परिसरातील हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी येथील काही पर्यटकांनी केली होती. याबाबत सोमवारी (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्तदेखील प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल घेत पळसदेव ग्रामपंचायतीच्या वतीने सुरक्षारक्षक व सूचनाफलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सरपंच अश्विनी काळे यांनी दिली.  दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणाची पाणीपातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे सुमारे ४० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले पळसदेव येथील ऐतिहासिक पळसनाथ मंदिर उघडे पडले आहे. हे मंदिर यादवकालीन असून, हेमाडपंती शैलीतील आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैली व अप्रतिम कलाकुसरीमुळे हे मंदिर नेहमीच इतिहासप्रेमी, अभ्यासक, पर्यटक यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे; मात्र काही हुल्लडबाजांमुळे या मंदिराच्या पावित्र्याला व बांधकामाला धोका पोहोचत आहे. मंदिराच्या शिखरावर चढून सेल्फी घेणारेही महाभाग आहेत. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला धोका पोहोचत आहे. मंदिर पाण्याखाली गेले असले, तरी येथील ग्रामस्थ पाणीपातळी घटल्यानंतर, मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिराशी येथील ग्रामस्थांचे भावनिक नाते घट्ट आहे; मात्र हुल्लडबाजा येथील वास्तूचे नुकसान करत असल्याचेही निदर्शनास आले आहे...........मंदिर परिसरात मोठ्याप्रमाणात पाण्याच्या बाटल्या, खाण्याच्या पदार्थांचा कचरा अढळून येतो. रविवार (दि. १९) सुटीच्या दिवसामुळे पुणे, इंदापूर, बारामती, सोलापूर, राशिन, करमाळा आदी भागातील अनेक इतिहासप्रेमींनी या मंदिराला भेट दिली. या वेळी हुल्लडबाजांच्या कृतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.  हुल्लडबाजांना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी ‘लोकमत’कडे केली होती. यासंदर्भात, सोमवारी (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत पळसदेव ग्रामपंचायतीने पावले उचलली आहेत; तसेच परिसरातील इतिहासप्रेमींनी देखील अशा हुल्लडबाजांना रोखून त्यांची तक्रार ग्रामपंचायतीकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.......... पळसनाथाचे पुरातन मंदिर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक; तसेच इतिहास अभ्यासक येतात. मात्र, त्या ठिकाणी काही लोक हुल्लडबाजी करतात तसेच मंदिरावर नाव कोरून मंदिराची दुर्दशा करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्या ठिकाणी वेगवेगळे सूचनाफलक येत्या दोन दिवसांत लावणार आहोत; तसेच मंदिर परिसरात कचराकुंड्या ठेवणार आहोत. हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच काही पर्यटक हौसेपोटी नावेतून पर्यटनस्थळी जातात. त्या नावेला कसलाही परवाना नाही. कोणत्याही नावेत लाईफ जॅकेट नाहीत. आम्ही त्याबाबत सर्व नावमालकांना नावेत लाईफ जॅकेट ठेवण्याचे आदेश देणार आहोत.  - अश्विनी संतोष काळे, सरपंच. .........

टॅग्स :Bhigwanभिगवण