शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकळे टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:20 IST

ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

ठळक मुद्देग्रामविकास अधिकारी सहा महिन्यापासून सतत गैरहजर

लासुर्णे : बेलवाडी (ता. इंदापुर) येथील ग्रामविकास अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील कामे रखडली आहेत. तसेच गावच्या विकासाला खो बसत आहे. वेळोवेळी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. बेलवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहा ते आठ हजारांवरती असून ग्रामविकास अधिकारी सहा महिन्यापासून सतत गैरहजर राहत आहेत. येथील नागरिकांना कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. दलित वस्ती विकास निधीला खो बसत आहे. यासाठी ग्रामविकास अधिका-यांच्या बदलीसाठी पाठपुरावा करूनही बदली होत नाही. तसेच दुसरा अधिकारी देखील मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी सरपंच माणिक जामदार, उपसरपंच स्वाती पवार, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, संचालक सर्जेराव जामदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग रायते, दत्तात्रेय घाडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता या बाबतीत पुर्ण माहिती घेऊन त्वरीत प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indapurइंदापूरgram panchayatग्राम पंचायत