शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलपासून केवळ पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:14 IST

राज्यातील सर्व स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये येत्या १ एप्रिलपासून आधार इनबिल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन

पुणे : राज्यातील सर्व स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये येत्या १ एप्रिलपासून आधार इनबिल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीमच्या (एईपीडीएस) माध्यमातून शिधावाटप केले जाणार आहे. यासाठी पुरवठा विभागाने सर्व दुकादारांना ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिली असून, आता अंगठ्याचा ठसा घेऊनच धान्याचे वितरण केले जाईल. त्यामुळे स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा दावा प्रशासकीय अधिकाºयांकडून केला जात आहे.शिधा घेताना प्रत्येक वेळी नागरिकाला ई-पॉस मशिनवर आपल्या अंगठ्याच्या ठस्याची (थम) जुळणी करूनच शिधा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना धान्यखरेदी करताना शिधापत्रिकेची (रेशनिंग कार्ड) गरज भासणार नाही. पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिली आहेत. या मशिनद्वारे सर्व नागरिकांच्या आधार कार्डाची माहिती आणि अंगठ्यांचे ठसे घेतले जात आहेत. पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे म्हणाल्या, ‘‘येत्या दोन ते तीन दिवसांत पुणे ग्रामीण भागातील सर्व नागरिकांची माहिती एईपीडीएस प्रणालीमध्ये संकलित होणार आहे. त्यामुळे पुणे ग्राणीम वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एईपीडीएस प्रणालीमध्ये नागरिकांच्या माहितीचे व अंगठ्यांच्या ठशांचे संकलन झाले आहे. येत्या १ एप्रिलपासून केवळ या प्रणालीद्वारेच धान्य वितरित केले जाईल. धान्यखरेदी केल्यानंतर प्रत्येक नागरिकाने दुकानदाराकडून धान्यखरेदीची पावती घ्यावी.