शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ‘गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज’ साहित्ययात्रेत विचारांचा जागर; दिग्गजांना दिली मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:43 IST

मराठी साहित्यासाठी अमूल्य असे योगदान देणाऱ्या साहित्यिकांच्या आठवणी, त्यांचे जीवन, त्यांची साहित्यसंपदा नव्या पिढीसमोर रविवारी (दि. २५) उलगडली.

ठळक मुद्देइतिहास प्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे साहित्ययात्रेचे आयोजननारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयापासून झाली साहित्ययात्रेची सुरुवात

पुणे :  मराठी साहित्यासाठी अमूल्य असे योगदान देणाऱ्या साहित्यिकांच्या आठवणी, त्यांचे जीवन, त्यांची साहित्यसंपदा नव्या पिढीसमोर रविवारी (दि. २५) उलगडली.  त्यांचे हे योगदान पोवाडे, लावणी, नाट्यछटा, एकपात्री, काव्यवाचन, कथाकथन अशा विविध कलाप्रकारातून मांडण्यात आले. निमित्त होते इतिहास प्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे. या यात्रेत आचार्य अत्रे यांच्या विडंबन कविता, टिळक आणि  आगरकर यांच्या तांबे वाड्यातील आठवणी, दिवाकर यांच्या नाट्यछटा, शाहीर होनाजी बाळा यांचे  शाहिरी प्रबोधन अशा मराठी भाषेला पुढे नेण्यात अग्रेसर असणाऱ्या साहित्यिक, समाजसुधारक यांना मानवंदना देण्यात आली. या साहित्ययात्रेची सुरुवात नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयापासून झाली. या यात्रेत प्रसाद मोरे, रुचिता भुजबळ, वेदांत बोरावके, गौरव बर्वे, शौनक कंकाळ, रितेश तिवारी, अभिजित दंडगे, चंद्रशेखर कोष्टी, सौमित्र सबनीस, ईशान जबडे, ईश्वरी ठिगळे या कलाकारांनी आपल्या कलाकृतीतून दिग्गजांना मानवंदना दिली. या वेळी मोहन शेटे, दिलीप ठकार, मिलिंद सबनीस, नगरसेवक हेमंत रासने उपस्थित होते.मोहन शेटे म्हणाले, मराठी राजभाषा दिनानिमित्त दिग्गज साहित्यिकांच्या घरांना भेटी देऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेता यावा तसेच या माध्यमाद्वारे त्यांचे स्मरण करून नवीन पिढीला या दिग्गज साहित्यिकांविषयी माहिती मिळावी या उद्देशाने या साहित्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

साहित्यिकांच्या निवासस्थानी जागर राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज), नाट्यछटाकार दिवाकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहीर होनाजी बाळा, सर्कसवीर दामू धोत्रे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री. म. माटे, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) या साहित्यिकांच्या निवासस्थानांना भेटी देऊन पोवाडे, लावणी, नाट्यछटा, एकपात्री, काव्यवाचन, कथाकथन अशा विविध कला प्रकारातून त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या.

टॅग्स :literatureसाहित्यnarayan pethनारायण पेठPuneपुणे