शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धती आणण्याचा सरकारचा प्रयत्न

By admin | Updated: February 14, 2015 03:01 IST

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे आता शिक्षणपद्धतीमध्ये बदल करून कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धत आणण्याचा प्रयत्न करणार आहे’’,

पिंपरी : ‘‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे आता शिक्षणपद्धतीमध्ये बदल करून कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धत आणण्याचा प्रयत्न करणार आहे’’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शुक्रवारी खडकीत केले. खडकी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सवी सोहळा शुक्रवारी खडकी येथे झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर शकुंतला धराडे, आमदार विजय काळे, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चिटणीस चंद्रकांत छाजेड, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, शरद रणपिसे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस अभय छाजेड, शांतीलाल मुथा, मुख्याधिकारी केएसजे चौहान आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘भविष्यकाळात गुणवत्तेवर आधारित शिक्षणाची गरज आहे. विधानसभेत शिक्षणाऐवजी शिक्षकांच्या प्रश्नावर अधिक चर्चा केली जाते. शिक्षकांच्याही प्रश्नांची चर्चा व्हायला हवी. त्याहीपेक्षा शिक्षणाची चर्चा व्हायला हवी. शिक्षकांनीही आपण या पवित्र कामास न्याय देतो का, याचे मूल्यमापन स्वत:च करायला हवे. कोणतेही सरकार परिवर्तन करणार नसून, शिक्षकच परिवर्तन घडवू शकतात. पिढी घडवू शकतात. तसेच विद्यार्थ्यांनाही ध्येय असावे, समाजाप्रति आपण काही तरी देणे लागतो, अशी भावना ठेवली, तरच जीवनाच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ शकतो.’’ पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘खडकीत राजकीय पक्षांमध्ये मतभेद असतील. मात्र, या शिक्षण संस्थेत कोणतेही राजकारण आणले जात नाही. याचा आदर्श अन्य संस्थांनी घ्यायला हवा. ’’सचिव छाजेड म्हणाले, ‘‘केजी ते पीजी शिक्षण या संस्थेतून दिले जाते. कोणतेही डोनेशन घेतले जात नाही. अशा संस्थेने विविध क्षेत्रातील मान्यवर घडविले आहेत.’’ अध्यक्ष जैन म्हणाले, संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा राष्ट्र आणि समाजासाठी उपयोग व्हावा, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.’’‘‘सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू झाली कार्यरत आहे. अनिसा सय्यद, विक्रम पिल्ले, धनराज पिल्ले यासारखे खेळाडू या संस्थेतून घडले. त्यावरून त्या संस्थेची गुणवत्ता काय आहे, हे लक्षात येईल, असे उपाध्यक्ष गोयल सांगितले.या वेळी कश्मिरी आगरवाल, गोयल, दत्ताजी गायकवाड, अशोक मुथा, विजय मुनोत, कर्नल बालसुब्रह्मण्यम् यांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गोयल व कार्याध्यक्ष  राजेश माने यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. या वेळी डॉ. वीणा मनचंदा, प. म. आलेगावकर यांच्या ज्ञानसाधनेची शतकपूर्ती, कथा साधनेची या पुस्तकांचे प्रकाशन झाले. आनंद देशमुख, श्रीपाद ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले. विलास पंगुडवाले यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)