शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक : डॉ. सप्तर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 04:22 IST

लोकांमध्ये जातपातीचे भेद पसरविणारे व मनस्मृतीचे समर्थन करणारे हे मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक असल्याचे मत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

पुणे : वेगवेगळी आश्वासने आणि विकासांची स्वप्ने दाखवून सर्वसामान्य माणसांची मते मिळविण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी झाला. मात्र त्यानंतर आपल्या जातधर्माच्या नावाने तयार केलेल्या विचारकलहामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांमध्ये जातपातीचे भेद पसरविणारे व मनस्मृतीचे समर्थन करणारे हे मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक असल्याचे मत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.युवक क्रांती दल, जागरूक पुणेकर मंच आणि ईव्हीएमविरोधी मंचतर्फे आयोजित ‘मनुस्मृती की भीमस्मृती’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. दीपाली भांगे, मयुरी शिंदे, प्रशांत कनोजिया, जांबवंत मनोहर, दिलीपसिंग विश्वकर्मा आदी या वेळी उपस्थित होते.तरुणांनी अधिक सावध राहण्याची गरजडॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली तेव्हा वैचारिक क्रांती झाली, परंतु अनेक जणांच्या मनात आजही मनुस्मृती जिवंत आहे. ब्राह्मण्यवादाच्या नावाखाली आजही काही समाज इतरांना आपल्या आधिपत्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी रोजच्या व्यवहारातून आणि आपल्या विचारांमधून मनुस्मृती दूर करणे गरजेचे आहे.विकासाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षाने लोकांची मते मिळविली, परंतु विकास करणे आपल्या आवाक्यात नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची धोरणे राबवायला सुरुवात केली, मनुस्मृतीच्या विचारांचे सरकार देशासाठी घातक आहे. याबरोबरच अच्छे दिन येणार आणि विकास होणार असल्याची स्वप्न भाजपाने दाखविली; परंंतु आज विकासाचा अजेंडा बाजूला राहिला.जात आणि धर्माचे राजकारण करून आज जात अधिक बळकट केली जात असून, काही समाजामध्ये भीती निर्माण केली जात आहे. यामुळे आपणच कायम सत्तेत राहू, हा त्याचा भ्रम असून यासाठी तरुणांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

टॅग्स :Kumar Saptarshiकुमार सप्तर्षीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी