शिवसेनेची मुख्यकार्यकारी
अधिकाºयांकडे मागणी
लासुर्णे : कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.अशातच इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालक व शिपाई पदाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने या कर्मचाऱ्यावर ताण येत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत प्रशासनाने भरण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय काळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्र असून आकरा रूग्णवाहिका आहेत. परंतु या आठ आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका चालक व शिपाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्वरीत प्रशासनाने या पदांची भरती करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख संजय काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. याचा आरोग्य विभागावर प्रचंड ताण आला आहे. अशातच इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका चालक व शिपाई यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रूग्णांना शासकीय मोफत मिळणाऱ्या सेवेचा वेळेत उपयोग मिळत नसल्याने शिवसेनेने या पदांची त्वरीत भरती करावी अशी मागणी उपजिल्हाप्रमुख संजय काळे यांनी केली आहे.
---
कोट्यवधींची इमारत कर्मचारी एकच
लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शासनाने कोट्यावधी रुपये खर्चुन बांधली आहे. या आरोग्य केंद्रात लासुर्णे, जंक्शन, अंथुर्णे, कळंब, वालचंदनगर, रणगाव, बेलवाडी व लासुर्णे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध वाड्या वस्त्यावरील अनेक रूग्ण येत असतात. या आरोग्य केंद्रात दररोज शंभर पेक्षा जास्त रूग्ण ओपीडी त उपचार घेतात. परंतु या आरोग्य केंद्रात एकच शिपाई तोही अपंग असल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यावर ताण येत आहे. अशा इतर देखील आरोग्य केंद्रात चालक शिपाई यांची रिक्त पदे आहेत ती प्रशासनाने त्वरीत भरावीत अशी मागणी केली असल्याचे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय काळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
———————————