शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

गुडविन ज्वेलर्सचा पुणेकरांना ३ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 10:33 PM

राज्यभरात खळबळ माजविणा-या तसेच मुंबई, ठाणे, डोंबिवलीपाठोपाठ गुडविन ज्वेलर्सने पुण्यातील गुंतवणूकदारांनाही ३ कोटी ४ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले

पुणे : राज्यभरात खळबळ माजविणा-या तसेच मुंबई, ठाणे, डोंबिवलीपाठोपाठ गुडविन ज्वेलर्सने पुण्यातील गुंतवणूकदारांनाही ३ कोटी ४ लाख रुपयांनागंडा घातल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुडवीन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, संचालक सुधीरकुमार अकाकरण मोहनन, शाखा व्यवस्थापक जस्टीन, सेल्समनअश्वीन, चंद्रिका, श्रीकला नायर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आतापर्यंत ८९ जणांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी आशा गायकवाड (वय ४५, रा. येरवडा) यांनी कोरेगाव पार्कपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गुडवीन ज्वेलर्सचे बंडगार्डन रोडवरील मोबाज चौकातील कॅनोट प्लेस या इमारतीत शोरुम होते. गेल्या काही दिवसांपासून ते बंद आहे.  गुडविन ज्वेलर्सचा मालक व व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, संचालक सुधीर अकाकरण, शाखा व्यवस्थापक जस्टीन, सेल्समन अश्विन, चंद्रिका, श्रीकला नायर यांच्यासह अन्य व्यक्तींनी संबंधित सराफी दुकानामधील भिशी व गुंतवणूक योजनेनुसार, पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळेल किंवा सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखविले, त्यानुसार गायकवाड व इतरांनी २०१८ मध्ये त्यांच्याकडे पैसे गुंतविले़ गायकवाड यांनी गुडवीन ज्वेलर्सकडे ३ लाख रुपये गुंतविले होते. परंतु त्यांची फसवणूक करण्यात आली. गायकवाड यांच्या प्रमाणे आणखी ८८ जणांनी गुडवीन ज्वेलर्सकडे पैसे गुंतविले होते. या ८८ जणांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांकडे ३ कोटी ४ लाख ४३ हजार ८८० रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गुडविन ज्वेलर्स २३ ऑक्टोबरपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. अनेक दिवस गुंतवणूकदारांनी ज्वेलर्स दुकानाचा पाठपुरावा केला, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिले. त्यानुसार गुडविन ज्वेलर्सवर एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Goodwin Jewellersगुडविन ज्वेलर्स