शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आधार केंद्रांच्या संख्येबाबत गोलमालच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:40 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३५०हून अधिक आधार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला; मात्र युनिक आयडेंटिफिकेशन आॅफ इंडियाच्या (यूआयडीएआय) संकेतस्थळानुसार जिल्ह्यात २४७ आधार केंद्र सुरू आहेत.

पुणे  - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३५०हून अधिक आधार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला; मात्र युनिक आयडेंटिफिकेशन आॅफ इंडियाच्या (यूआयडीएआय) संकेतस्थळानुसार जिल्ह्यात २४७ आधार केंद्र सुरू आहेत.परिणामी, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीत तब्बल ११५ आधार केंद्रांची तफावत आहे.जिल्ह्यात प्रथमत: ४० आधार केंद्रे सुरू झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाआॅनलाइन, यूआयडीएआयकडे पाठपुरावा करून आधार केंद्र वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच, आधार यंत्रे दुरुस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर मिळावेत आणि खासगी आधार यंत्रचालकांनी शासकीय इमारतींमध्ये आधारची कामे करण्याला परवानगी द्याावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवीला होता.त्यास मान्यता मिळाल्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्र पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. तसेच, देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने दिल्या. त्यानुसार बँका व पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५० हून अधिक केंद्र सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.-गेल्या आठवड्यात पुण्यातील बँकांमध्ये ६१, टपाल कार्यालयांमध्ये ४७, महाआॅनलाइन केंद्रांमध्ये ४५, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २०, तसेच पिंपरी-चिंचवडमधील बँकांमध्ये १४, टपाल कार्यालयांमध्ये १७, महाआॅनलाइन केंद्रांमध्ये १२, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ८, नागरी सुविधा केंद्रांमध्ये १८, तर ग्रामीण भागात १२० ठिकाणी, अशी ३६२ केंद्र सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती.-यूआयडीएआयच्या संकेतस्थळानुसार शहरात ७० आणि जिल्ह्यात ६०, बँका आणि पोस्ट कार्यालयांमध्ये ११७ अशा एकूण २४७ ठिकाणी आधार केंद्र सुरू आहेत. परिणामी, जिल्हा प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार जिल्ह्यात तब्बल ११५ आधार केंद्र कमी असल्याचेदिसून येत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे