शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

जिल्हा प्रशासनाकडून दुबार मतदारांची घरी जाऊन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:34 PM

मतदार यादीत नाव नोंदविणे,मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरु मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) वर्गाकडून मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी

पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविणे,मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत.  मतदार यादीतील दुबार अथवा समान नावे असलेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जाऊन पडताळणी केली जाईल. त्यानंतर ज्या ठिकाणी मतदार आढळून येईल, अशा ठिकाणी मतदाराचे नाव कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हा निवडणुक अधिकारी मोनिका सिंह या वेळी उपस्थित होत्या. भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांना प्रशिक्षण, सर्व बीएलओंची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण , मतदार यादीतील तफावतींचा शोध, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण , मयत, दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करणे आदी कामे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचे पुनर्निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान असलेली नावे संगणक प्रणालीद्वारे शोधली जर्तील. त्यामध्ये समान अथवा दुबार नाव आढळ्यास त्या मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात येईल. दुबार नाव असल्यास मतदाराकडून मतदार यादीतील नाव वगळण्यासाठीचा अर्ज भरून घेतला जाणार आहे. मतदारयादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ट केली जाणार आहेत. ही मोहिम २० जून २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात ७ हजार ५३४ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेcollectorतहसीलदारElectionनिवडणूकNavalkishor Ramनवलकिशोर राम