शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव - योगेंद्र यादव

By admin | Updated: June 15, 2015 09:16 IST

भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे.

पुणे : भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशातील अशा महत्वाच्या संस्थांवर अशा लोकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे देशातील या संस्थांवर दुरगामी परिणाम होतील, अशी टीका स्वराज्य अभियानाचे प्रा. योगेंद्र यादव यांनी केली. चौहान यांच्या नियुक्तीवरून 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. प्रा. यादव हे रविवारी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संस्थेत आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चौहान यांच्या नियुक्तीवरून भाजपा सरकारवर टीका केली. यादव म्हणाले, देशात अनेक अशा संस्था आहेत, त्यावर प्रत्येकाला गर्व आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून या संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. गिरीश कर्नाड यांच्यासह अनेकांनी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र चौहान यांच्या नियुक्तीने संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. मोठय़ा संस्थांच्या प्रमुखपदी नियुक्ती कराव्यात अशा व्यक्ती भाजपामध्ये सापडत नाहीत. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर हसावे की रडावे अशी अवस्था होते. भारतीय मुल्य, संस्कृती, संस्थांचा इतिहास या लोकांना माहित नाही. चांगल्या लोकांना काढून ते असे लोक बसवत आहेत. भविष्यात याचे दुष्परिणाम होतील, याची त्यांना कल्पना नाही, असे प्रा. यादव यांनी नमुद केले. हे तर संस्थेचे अवमूल्यन : योगेंद्र यादव एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर संवाद साधताना योगेंद्र यादव. पुणे : पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाशी निगडित असलेल्या पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड केली आणि आता त्याच पक्षाशी निगडित असलेल्या गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. यावरून मोदी सरकारने चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव आखला आहे, असा गंभीर आरोप माहितीपट निर्माते आनंद पटवर्धन यांनी रविवारी केला.फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे चौहान यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पटवर्धन आले होते. या वेळी त्यांनी हा आरोप केला. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला यापूर्वीच 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने (एनएसडी) पाठिंबा दिला असून, आज पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सर्मथन दिल्याने आता हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये आजही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत चौहान यांना हटविण्याची मागणी केली.या वेळी पटवर्धन म्हणाले, ''चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 'भीष्म पितामह' म्हणजेच मुकेश खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. तर आता एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी 'युधिष्ठिर'ची म्हणजेच गजेंद्र चौहान यांची निवड करण्यात आली आहे. आता या महाभारतातील फक्त 'कृष्ण'च येण्याचा राहिला आहे. मोदी सरकार आल्यानंतरच या सर्व क्षेत्राचे भगवीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौहान यांना केलेला विरोध योग्य आहे.''ते म्हणाले, ''ही निवड कशाच्या आधारावर करण्यात आली, त्यासाठी कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला, याचा खुलासा सरकारने करायला हवा. मात्र, सरकार हा खुलासा करीत नसल्याने चौहान यांची निवड राजकीय वरदहस्त असल्याने अपारदश्री पद्धतीने करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.''