शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

ढोल-ताशांच्या दणदणाटात गणरायाला निरोप

By admin | Updated: September 25, 2015 00:55 IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात व मंगलमय वातावरणात सात दिवसांच्या गणरायाला जुनी सांगवी व नवी सांगवीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत

पिंपळे गुरव : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात व मंगलमय वातावरणात सात दिवसांच्या गणरायाला जुनी सांगवी व नवी सांगवीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत जड अंत:करणाने बुधवारी निरोप देण्यात आला.सांगवी व नवी सांगवी परिसरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांनी बुधवारी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती. परिसरात सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतोे. सकाळपासूनच गणेश विसर्जनाची तयारी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. परिसरातील मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि डीजेच्या तालावर काढलेल्या मिरवणुकीनंतर जुनी सांगवी येथील विसर्जन घाटावर गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले. या मिरवणुकीमध्ये लहान मुलांसह तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. विसर्जन मिरवणुकीमध्ये झांज पथकाच्या तालावर तरुणाईने ताल धरला होता. मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने गणेशभक्त सहभागी झाले होते. जुनी सांगवी येथील बालाजी प्रतिष्ठानची मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. हर्षल ढोरे यांच्या कार्यकर्त्यांमुळे मिरवणुकीत शिस्तबद्धता होती. शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाचे ढोलपथकही लक्षवेधक होते. सिद्धिविनायक सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट अखिल शिवस्मृती मित्र मंडळाने सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढली. संस्थापक बजरंग ढोरे यांनी संयोजन केले. सांगवी गावठाणातील राही-माई प्रतिष्ठान व शिवमित्र मंडळाने सकाळी ११ वाजताच सूर्यरथातून मिरवणूक काढली. यामध्ये मोरया ढोल पथकाचा सहभाग होता. सिझन गु्रप वेलफेअर ट्रस्टचा सांगवीचा राजा नावाने प्रचलित असलेली श्रींची आकर्षक, भव्य मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. मधुबन मित्र मंडळाने फुलांनी सजावट करून मिरवणूक काढली. गंगानगर येथील गणराज मित्र मंडळाने मिरवणूक न काढता, मंडळाचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला देण्यात आला. शितोळेनगर येथील जय माता दी, प्रियदर्शनीनगर, अखिल ममतानगर, पवनानगर, रणझुंजार, जयभवानी, शिवशक्ती आदी मंडळांनी आकर्षक मिरवणूक काढली. नवी सांगवीतील जय मल्हार व शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या आकर्षक मिरवणुकीतील ढोल पथकाने मने जिंकली. समतानगर मित्र मंडळाने फुलांची केलेली सजावट विलोभनीय होती. रथावर जनजागृतीपर फलक लावले होते. अखिल क्रांती चौक, नवी सांगवी विभागीय, श्री कृष्णाई मित्र, चैत्रबन, कीर्तिनगर, वागजाई, बारामती आदी मंडळांनी दिमाखात मिरवणूक काढली. महापालिकेच्या आरोग्य विभागच्या वतीने विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेरे, निर्माल्य कलश आदींची व्यवस्था क रण्यात आली होती. पर्यावरण जागृतीविषयी फलकही लावण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप नौकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २००पेक्षा जास्त कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. ५ पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलीस निरीक्षक, ११५ पोलीस कर्मचारी, १७० पोलीस मित्रांचा बंदोबस्तामध्ये समावेश होता. (वार्ताहर)