शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

प्रतिष्ठापनेसाठी उद्या वैभवशाली मिरवणुका

By admin | Updated: September 4, 2016 04:22 IST

मी येतोय..’ अशी साद घालत बाप्पाने सर्वांनाच वेध लावले आहेत. गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला असताना बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळांची लगीनघाई सुरू झाली

पुणे : ‘मी येतोय..’ अशी साद घालत बाप्पाने सर्वांनाच वेध लावले आहेत. गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला असताना बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळांची लगीनघाई सुरू झाली आहे. पुण्याची समृद्ध परंपरा असलेल्या पाच मानाच्या गणपतींच्या स्वागतासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, गुरुजी तालीम, केसरीवाडा या पाचही मंडळांच्या सोमवारी सकाळी निघणाऱ्या मिरवणुकींकडे आणि प्रतिष्ठापनेकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी मिरवणुकांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मानाच्या गणपती मंडळांची बैठक वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली.कसबा गणपती : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची पालखीतून मिरवणूक सोमवारी (दि. ५) सकाळी ८.३० वाजता उत्सवमंडपातून निघणार आहे. दोन ढोल-लेझीम पथके, प्रभात ब्रास बँड, सनई-चौघडा वादन आणि ढोल-ताशांच्या गजराने पारंपरिक मिरवणूक रंगणार आहे. ११ वाजून १६ मिनिटांनी मठाधिपती प्रसाद प्रभुणे यांच्या हस्ते ‘श्रीं’ंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.तांबडी जोगेश्वरी : तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सकाळी १० वाजता मंदार लॉज येथून निघणार आहे. लोखंडे तालीम, कुमठे चौक, लक्ष्मी रस्ता, गणपती चौक, जोगेश्वरी मंदिर या मार्गाने मिरवणूक निघेल. दुपारी १२ वाजता उत्सव मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना गंगोत्री ग्रीन बिल्टचे मकरंद केळकर आणि अपर्णा केळकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सतीश आढाव यांचे नगारावादन होईल. बाळासाहेब आढाव यांचा न्यू गंधर्व ब्रास बँड आणि शिवमुद्रा पथक यांच्या वादनाने मिरवणुकीची शान वाढेल, असे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.तुळशीबाग : तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता गणपती चौकातून सुरुवात होणार आहे. फुलांची सजावट केलेल्या रथातून ‘श्रीं’चे आगमन होईल. गणपती चौक, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा, सिटी पोस्ट या मार्गाने गणपती चौकातून बाप्पाचे मुख्य मंडपात आगमन होईल. गजलक्ष्मी, शौर्य आणि रुद्रगर्जना ही तीन पथके मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, अशी माहित नितीन पंडित यांनी दिली.केसरीवाडा : केसरीवाडा या मानाच्या गणपतीची सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान रोहित टिळक आणि प्रणिती टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम पथकाचे वादन, बिडवे बंधूंचे सनई, चौघडा वादन अशा पारंपरिक पद्धतीने रमणबागेपासून केसरीवाड्यामध्ये ‘श्रीं’चे आगमन होणार आहे, अशी माहिती रवी कुलकर्णी यांनी दिली.गुरुजी तालीम : मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. फुलांची सजावट असलेला ‘श्रीं’चा रथ हे वैशिष्ट्य असेल. शितळादेवी मंदिर, गणपती चौक, लक्ष्मीरस्ता, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर, सिटी पोस्ट या मार्गाने मिरवणुकीचे मुख्य मंडपात आगमन होईल. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान मणिलाल गड्डा हे सपत्नीक गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.बाबू गेनू मंडळ: सकाळी ८.३० वाजता १२ फुटी मयूर रथातून ‘श्रीं’च्या मूर्तींची दिमाखात मिरवणूक निघणार आहे. मुख्य मंडपापासून शनिपार, बाजीराव रस्ता, वैभव टॉकीज, बेलबाग चौक, दत्त मंदिर, रामेश्वर मंदिर येथून मिरवणूक पुन्हा मुख्य मंडपात येईल. सकाळी ११.३० वाजता मंडळाच्या संस्थापक सदस्यांच्या हस्ते ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. शिवतेज आणि श्रीराम ही दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : सकाळी ८ वाजता दगडूशेठ मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, नूमवि, टिळक पुतळा या मार्गाने मिरवणूक पुन्हा मंदिराजवळ येईल. ११.०१ मिनिटांनी ‘श्रीं’ची महामंगलआरती होईल आणि इंदोरमधील त्रिपदी परिवाराचे डॉ. बाबासाहेब पराणेकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभात आणि दरबार ब्रास बँड मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे, विनायक देवळणकर यांचे नगारावादन होईल. ग्रामीण भागातील पथकांना मिरवणुकीत प्राधान्य देण्यात आले आहे. यंदा मंडळातर्फे महाबलीपूरम येथील शिवमंदिराची प्रतिकृती सजावटीच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. या सजावटीचे उद्घाटन सोमवारी (दि.५) सायंकाळी ६ वाजता पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अशोक गोडसे यांनी दिली.अखिल मंडई गणपती : सकाळी ९ वाजता मंडई मंदिरापासून मिरवणूक निघणार आहे. क्रांती चौक, रामेश्वर चौक, झुणका भाकर केंद्र या मार्गाने मंडई प्रदक्षिणा होईल. मृत्युंजय, मोरया ग्रुप या ढोल-ताशा पथकांचा मिरवणुकीत सहभाग आहे. फुलांची सजावट असलेल्या रथातू ‘श्रीं’चे आगमन होणार आहे. ११ वाजून ५२ मिनिटांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांच्या हस्ते होणार आहे. हरिशचंद्र चिरमाडे यांनी तयार केलेली दिव्य गणेश महाल ही यंदाची सजावट आहे. गणेश महालातील झोपाळ्यावर ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, अशी माहिती संजय मते यांनी दिली.