पुणे : उद्योगपती, भांडवलदार ,शासकीय नोकरदार यांच्यावर जसं सरकार प्रेम करतं, थोड आमच्यावरही करा. रिक्षा चालकांचे प्रश्न आहेत. यात खुला रिक्षा परवाना बंद करा, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ करा, विम्याची लूट थांबवा,ओला उबेर ची बेकायदा वाहतूक बंद करा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. तेव्हा रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन करीत मागण्यांचे निवेदन रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना दिले. शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. कोरोना काळात तर रिक्षाचालकाचा जगण्या - मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. रिक्षा पंचायतच्या वतीने आता पर्यंत विविध माध्यमाने सरकार समोर प्रश्न मांडले. रिक्षा चालकांची परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना मागण्याचे निवेदन देत गुलाब दिले. आनंद बेलमकर, प्रशांत कांबळे, बाप्पू धुमाळ,मधुकर भुजबळ, बाळासाहेब पोकळे, आदी आदी उपस्थित होते.
शासकीय नोकरदाराप्रमाणे आम्हालाही थोडं प्रेम द्या; रिक्षाचालकांची सरकारला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:36 IST