शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलरी डिझायनिंगची लाखो रुपयांची मशिनरी पडून, पुणे विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्राला देण्याची सुचली उपरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 04:19 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याच्या हेतूने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सन २००६ मध्ये तब्बल ९ लाख ४८ हजार रुपये खर्च करून ज्वेलरी डिझाइन मशिनरी खरेदी केली.

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याच्या हेतूने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सन २००६ मध्ये तब्बल ९ लाख ४८ हजार रुपये खर्च करून ज्वेलरी डिझाइन मशिनरी खरेदी केली. हे प्रशिक्षण घेण्यासाठी देशात विद्येचे माहेरघर म्हणून बिरुदावली मिळविणाºया पुणे शहरात एकही प्रशिक्षक मिळू शकले नाही. यामुळे तब्बल दहा वर्षांपासून लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या मशिनरी धूळ खात पडून आहेत. आता ही मशिनरी दुरुस्त करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्वेलरी डिझाईन प्रशिक्षण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तत्कालीन महापालिका आयुक्त व सह महापालिका आयुक्त यांनी मुंबईस्थित इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी येथील संस्थेला भेट दिली. त्यानंतर पुणे मपाहालिकेच्या वतीने शहरातील आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने खास ज्वेलरी डिझाइन प्रशिक्षण धोरण तयार केले.यामध्ये ज्वेलरी डिझाइन प्रशिक्षण, ज्वेलरी फिनिशिंग,ज्वेलरी कास्टिंग, ज्वेलरीमेकिंग, कारागिरी आदीविविध प्रकारची प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी खरेदी करण्यात आली.- मशिनरी खरेदी केल्यानंतर महापालिकेच्या वतीने संगणक आधारित ज्वेलरी डिझाइन प्रशिक्षण, ज्वेलरी फिनिशिंग, ज्वेलरी कास्टिंग, ज्वेलरी मेकिंग, कारागिरी अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ प्रशिक्षक, अभ्यासक्रमाची रूपरेषा, प्रशिक्षणाचे मूल्यांकन करणारी व्यवस्था व या क्षेत्रातील उद्योजकांची मान्यता असणारे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था न झाल्याने तब्बल गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या ज्वेलरी डिझाइन मशिनरी वापराविना पडून असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.- महापालिकेच्या समाज विकास विभागाने आता या मशिनरीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व मशिन दुरुस्त करून चालविण्यास योग्य स्थिती आल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राला कोणताही मोबदला नघेता चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु या मशिन दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी देण्यासाठी हा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका