शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

शासकीय आरोग्य संस्थेत धूळ खात पडलेले व्हेंटिलेटर खासगी आरोग्य संस्थांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:28 PM

आयुष प्रसाद यांचे प्रशासकीय यंत्रणेला पत्र

ठळक मुद्देखासगी आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळ आणि तांत्रिक गोष्टी मुबलक प्रमाणात

पुणे: राज्यासाहित पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊन त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासू लागली आहे. सीएसआर आणि शासकीय निधीतून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र प्राधान्याने ते शासकीय संस्थांना देण्यात आले आहेत. परंतु शासकीय संस्थांमधील अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक गोष्टी यामुळे व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत. असे वापरात नसलेले पण वापरण्यायोग्य व्हेंटिलेटर  खासगी संस्थांना द्यावेत. अशी सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय यंत्रणेला पत्राद्वारे केली आहे. 

खासगी आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळ आणि तांत्रिक गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. व्हेंटिलेटरचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने ते शासकीय रुग्णालयात देण्यात आले आहेत. पण मनुष्यबळ अभावी त्यांचा वापर होत नाहीये. खासगी संस्थांमध्ये ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध आहेत. या व्हेंटिलेटरचा वापर कोव्हिडं रुग्णांसाठी होईल. असा करारनामा करून ते वापरण्यासाठी द्यावेत. शासनाने आकारलेल्या दरातून रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत. असेही त्यांनी पत्रातून नमूद केले आहे. पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊ लागले आहेत. रुग्णांचा बेड आणि व्हेंटिलेटर न मिळल्याने जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटरचा तुटवडा भासू लागला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून व्हेंटिलेटरचा पुरवठा हळूहळू होत आहे. पण ते वापरण्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा त्यांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत खासगी संस्था व्हेंटिलेटर वापरण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यांना अल्पदरात व्हेंटिलेटर देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल