शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा

By admin | Updated: February 21, 2015 02:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती. मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सगळे व्यवहार शिवाजी महाराज मराठीतून करीत असत. मातृभाषेचे महत्त्व ओळखणारे शिवाजी महाराज हिंदुस्थानातील पहिले राजे होते, असे मत ज्येष्ठ लेखक हरी नरके यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सरहद संस्थेचे संचालक संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, परिषदेचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते.नरके म्हणाले, की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. येत्या आठवडाभरात ही घोषणा झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाने ठरविलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे भाषेला विशेष दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय येत्या आठवडाभरात होईल. भालचंद्र नेमाडे यांनी राग सोडावा, राग वैयक्तिक स्वरूपाचे असतात, त्याचा सामाजिक परिणाम होऊ नये. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्याची आमची इच्छा आहे, असे माधवी वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मातृभाषेला कमी लेखू नये४मराठी भाषेचं वय हे दोन ते अडीच हजार वर्षांचं आहे. मराठी भाषेच महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या मातृभाषेला कमी लेखता कामा नये. मराठी संस्कृतमधून जन्माला आलेली नसून, ती संस्कृतच्या आधी जन्माला आलेली आहे. मराठी भाषा संस्कृतची मुलगी नाही, तर मराठी संस्कृतची मावशी आहे, असे मत हरी नरके यांनी व्यक्त केले.