शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालात यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 06:19 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे.

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. गेल्या काही वर्षांत नव्वदी ओलांडलेल्या निकालात यंदा घट झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत तो एक टक्क्याने घसरला आहे. या वेळीही मुलींनीच बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.८५ टक्के तर मुलांचे ८५.२३ टक्के आहे.राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. राज्यात ६६ हजार ४५६ पुनर्परीक्षार्थीं होते त्यापैकी २२ हजार ७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणपत्रिकेच्या मूळप्रतीचे वाटप त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १२ जून रोजी सकाळी ११ वाजता केले जाणार आहे. राज्यातील २,३०१ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर ५८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के आहे. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखांच्या निकालानुसार विज्ञान शाखेतील १०, कला शाखेतील ३६, वाणिज्य शाखेतील ११ तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील एका कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे.१४ जण निलंबितबीड जिल्ह्यातील एका शाळेत उत्तरपत्रिका जळाल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणी १४ जणांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर बार्शी कॉपी प्रकरणामध्ये एकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जात असल्याचे शकुंतला काळे यांनी सांगितले.आजपासून करता येणार गुणपडताळणीसाठी अर्जगुणपडताळणी व छायाप्रतींसाठी गुरुवारपासून अर्ज करता येईल. मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून २०१८ या कालावधीत, तर छायांकित प्रतीसाठी ३१ मे १९ जून २०१८ पर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळाल्यानंतर, ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.फेरपरीक्षा लवकरच : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट २०१८मध्ये होणार आहे. हा निर्णय विद्यार्थी, पालकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगाने येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी सर्व विभागीय मंडळात समुपदेशक नेमण्यात आले आहेत. 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८