भोर : शाळेतून घरी येत असताना वारंवार पाठलाग करून अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी सुनील संभाजी चोरघे (वय २६, रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला भोर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीही पुण्यात अशाच प्रकारचे दोन गुन्हे या तरुणावर दाखल झाल्याचे समजते.याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : भोरमधील इयत्ता दहावीत शिकणारी एक मुलगी शाळेत जाताना व येताना क्लासच्या बाहेर दररोज पाठलाग करून तुझ्याबरोबर बोलायचे आहे, असे म्हणून थांबवत असे. मात्र ही मुलगी त्याच्याबरोबर न बोलताच पुढे जात असे. तरीही सुनील चोरघे दररोज या मुलीला मागील १५ दिवसांपासून त्रास देत होता. याबाबत मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितले नाही. २१ आॅक्टोबरला या मुलाने क्लासमधून घरी येत असताना मी चार दिवस बाहेर जात असून परत आल्यावर मला हॉटेलमध्ये भेट, असे सांगितले. मुलीने नकार दिला. मात्र चोरघे म्हणाला, मला काही माहीत नाही, तू भेट हा त्रास अधिकच वाढल्याने मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर तिच्या आईने वडिलांना व सोसायटीमधील लोकांना सांगितले. (वार्ताहर)
मुलीच्या छेडछाड प्रकरणी तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2015 23:50 IST