शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहन कागदपत्राच्या जाचातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:55 IST

डिजीलॉकरचा आधार; कागदपत्रे बाळगण्याची गरज संपणार

पुणे : वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र खराब झाले, गहाळ झाले, वाहन चालविताना कागदपत्रे जवळ नसली तरी आता चिंता करण्याची गरज नाही. या कागदपत्रांबरोबरच इतर शासकीय आणि वैयक्तिक प्रमाणपत्र संगणकीय ‘डिजिटल लॉकर’मध्ये (डिजीलॉकर) जमा करता येणार आहेत. ‘एम परिवहन’ या मोबाइल अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येईल. कागदपत्रांची सुरक्षितता देखील यामुळे वाढणार आहे.प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी आणि राष्ट्रीय माहिती केंद्राचे तांत्रिक संचालक दीपक सोनार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान विभागाने डिजिटल लॉकर ही संकल्पना आणली असून, विविध शासकीय संस्थांकडून नागरिकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे त्यावर जतन करून ठेवण्यात येत आहेत. त्यासाठी नागरिकांना डिजिटल लॉकरचे खाते उघडावे लागेल.डिजिटल लॉकरचे खाते कसे सुरु कराल?डिजिटल लॉकरचे खाते सुरू करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असून, तो मोबाइल क्रमांकाशी जोडलेला असणे गरजेचे आहे. ‘डिजीलॉकर’ या संकेतस्थळावर जाऊन अथवा प्लेस्टोअरमधून डिजीलॉकर हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर आधार क्रमांक नोंदवून या अ‍ॅपवर लॉग इन व्हावे. या प्रकियेनंतर संबंधितांच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. तो भरल्यास संबंधित खाते कार्यान्वित होते.

टॅग्स :digitalडिजिटल