पिंपरी : तलावावर ठेकेदारांकडून साहित्याची परस्पर विक्री केली जात होती. शिकाऊकडून पैशांची लूट व फु कट्यांच्या संख्येत वाढ झाली होती. या सर्व गोष्टीस तरण तलावाचे कर्मचारी आळा घालत आहेत. तसेच तलावाची क्षमता नसतानाही पोहता न येणाऱ्यांनाही तलावाच्या आत सोडले जात होते. आता तरण तलावात उतरण्यास कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मज्जाव केला आहे. बेकायदा साहित्यविक्रीची परिस्थिती शहरातील सर्व जलतरण तलावावर दिसून येत होती. कासारवाडी, थेरगाव, प्राधिकरण, मोहननगर, पिंपळे गुरव, केशवनगर ठिकाणी हे प्रकार घडत आहेत. कर्मचाऱ्यांच्या साखळ्या करून पैशांची वाटणी केली जात असे. याला काही प्रमाणात पायबंद बसल्याचे निदर्शनास आले आहे. तरण तलावावर काळा बाजार व तरण तलावावर सुविधांची वानवा हे वृत्त ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये दि. ८ व १० मेच्या अंकात छायाचित्रासाह प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. काही जलतरण तलावांवर देखभाल-दुरुस्ती केली आहे. खासगी बॅचची चौकशी करण्यात येत आहे. जलतरण साहित्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच क्रीडा विभागाची बैठक आयोजित करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियोजनाबाबत सुनावण्यात आले. गैरप्रकारांना आळा घातला नाही तर कारवाई करण्यात येईल, असा आदेश सहायक आयुक्त दत्तात्रय फुं दे यांनी बैठकीत दिला.तलावात सोडताना कॉस्च्युमची विचारणा केली जात आहे. तिकीटतपासणी व्यवस्थितपणे केली जाते. महापालिकेकडून ट्युब व कॉस्च्युमचा पुरवठा होत नाही असे साहित्य नागरिकांनी स्वत: आणायचे आहे, अशा कडक शब्दांत पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी सांगितले.(प्रतिनिधी)
गैरप्रकारांना बसला आळा
By admin | Updated: May 12, 2015 04:20 IST