शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अटक कराल, तर रास्ता रोको! सणसवाडी ग्रामसभेत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:58 IST

कोरेगाव भीमा-सणसवाडी दंगल प्रकरणी पोलिसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केल्याने संतप्त झालेल्या सणसवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन कारवाईचा निषेध केला. तसेच, अटक सत्र न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा-सणसवाडी दंगल प्रकरणी पोलिसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केल्याने संतप्त झालेल्या सणसवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन कारवाईचा निषेध केला. तसेच, अटक सत्र न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.एक जानेवारीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिसांनी पुन्हा स्थानिक तरुणांना लक्ष्य करीत अटक सत्र सुरू केले आहे. त्यामुळे आज सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात ग्रामसभा आयोजित केली. या वेळी तब्बल दोन हजार ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, माजी सरपंच वर्षा कानडे, माजी उपसरपंच पंडित दरेकर, रांजणगाव देवस्थानचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विजयराज दरेकर, बाबा दरेकर, शिवाजी दरेकर, संभाजी साठे, नामदेव दरेकर, पोलीस पाटील दत्ता माने, गणेश कानडे, गोरख भुजबळ, गोरख दरेकर, सोमनाथ दरेकर व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.या ग्रामसभेत ग्रामस्थ व महिलांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, स्वत:च्या घरांची, वाहनांची व्यवसायाची होणारी तोडफोड, जाळपोळ पाहत असताना संरक्षणासाठी जाणाºया तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आम्हीच आमची घरे का पेटवू ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही ग्रामस्थांनी या वेळी दिला....तर गाव, कारखाने बंद करूगावाने आजवर जातीय सलोखा जपलाअसूनही एकाच गुन्ह्यात दोनदोनदा नाव येत असल्याने अटकेच्या कारवाईमुळे स्थानिक तरुण भीतीच्या छायेखाली आहेत. दंगलीत पोलिसांनी मदतीला बोलावलेल्या स्थानिक तरुणांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे करीत असल्याचीहीटीका या वेळी केली.यापुढे एका जरी तरुणाला अटक करण्याची कारवाई सुरु जरी केली त्याच क्षणी गाव, कारखाने बंद करून ग्रामस्थ व महिला कुटुंबांसह रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले.पोलिसांनी पुन्हा सुरू केलेल्या अटकसत्राविरोधात मंत्रालयात मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनाभेटून तारांकित प्रश्नाद्वारे बाजू मांडणारअसल्याचे सांगितले.पोलिसांची पुरावे तपासूनच कारवाई सुरू आहे. एकाही निरपराध्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. दरम्यान दुपारी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सणसवाडी ग्रामस्थांची बैठक घेऊन चर्चा केली होती.- डॉ. संदीप पखाले, अप्पर पोलीस अधीक्षक

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या