शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

गाड्या अडवून लूटमार करणारे गजाआड

By admin | Updated: September 15, 2015 04:33 IST

राष्ट्रीय महामार्ग २२२ (नगर-कल्याण महामार्ग) वर गेल्या ६ महिन्यांपासून गाड्या अडवून लूट करणाऱ्यांना ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी व महामार्गावर

ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ (नगर-कल्याण महामार्ग) वर गेल्या ६ महिन्यांपासून गाड्या अडवून लूट करणाऱ्यांना ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी व महामार्गावर नाकेबंदी करून गाडीचा पाठलाग करत पकडले. सिनेस्टाईल कामगिरी करून ओतूर पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींना गजाआड केले. काही दिवसांपासून माळशेज घाटात लूटमार सुरू होती. परंतु ज्यांची लूटमार झाली ते फिर्याद देण्यास अथवा पोलिसांना कळविण्यास घाबरत होते. नंतर काही दिवसांनी या घटना समजत; परंतु वेळ निघून गेलेली असे. या लुटारू टोळीचा शोध घेण्यासाठी कर्मचारी रात्री गस्तीवर असत. दि. १३ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मढ (ता. जुन्नर) गावचे हद्दीत कोंबड्या भरलेली पिकअप जीप नं. (एम.एच.०४ डी.एस.२६४४ ) कल्याणकडे जात होती. मढ गावच्या हद्दीत ती आली असताना रस्त्यावर सॅन्ट्रो कार क्र. (एम.एच.०६ ए.बी.२२७८ ) उभी होती व थोड्या अंतरावर लुटारू उभे होते. त्यांनी पिकअप जीपच्या चालकास हात दाखवून गाडी बाजूला घेण्यास भाग पाडले. जीप चालकाला दमदाटी केली. जबरदस्तीने जवळ असणारी सर्व रोख रक्कम, खिशातील साहित्य, पावत्या काढून पिकअपमधील कोंबड्या काढून घेतल्या.पिकअपचा चालक हजरत अली ऊर्फ फंदा यांनी ओतूर पोलिसांना या लुटीची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले यांनी जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा येथील पोलिसांना माहिती देऊन त्वरित नाकेबंदी करण्यास सांगितले. ते स्वत: नगर-कल्याण महामार्गाने या मार्गावर मढ गावचे दिशेने निघाले, पोलिसांनी गाडीवरील सरकारी वाहनाचा अंबर दिवा बंद केला. पोलिसांची गाडी या अज्ञात लुटारूंनी अडविली. तेव्हा ही पोलीस गाडी आहे, हे लुटारुंच्या लक्षात आले. तिघे लुटारू सॅन्ट्रो कार क्र. (एम.एच.०६ ए.बी. २२७८) मध्ये बसून जुन्नरच्या दिशेने वेगात जाऊ लागले. पाठलाग सुरू असताना जुन्नर येथे नाकाबंदीसाठी तैनात असलेले पो.स.इ.राकेश कदम यांना त्वरित माहिती दिली, तेही मढ कडून येणाऱ्या जुन्नर रस्त्यावर नाकाबंदी करणारे पोलीस पथक घेऊन थांबले होते. ओतूर पोलीस या गाडीचा पाठलाग करीत होते. या लुटारूंची सॅँट्रो कार जुन्नर येथील शिवाजी चौकात दोन्ही पोलिसांनी पकडली. (वार्ताहर)