शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीवर गावडे आणि चिंचवडे यांची वर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 15:28 IST

ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले.

ठळक मुद्दे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी डावलेल्या नाराजीतून राजीनामे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील दोन रिक्त जागेवर भाजपचे राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची शुक्रवारी (दि.२० एप्रिल) ला झालेल्या महासभेत वर्णी लावली आहे. महापौर नितीन काळजे यांनी दोघांची नावे जाहीर केले. महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी डावलेल्या नाराजीतून सदस्य राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामा दिले होते. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या जागी गावडे व चिंचवडे या दोघांची निवड करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे समर्थक जाधव हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांच्याबरोबरच निष्ठावंत गटाचे शिंदे आणि विलास मडिगेरी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी तेही इच्छूक होते. परंतु, ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले.परंतु, ते मंजूर करण्यात आले नव्हते.स्थायी समिती सभापतीची निवडणूक पार पडल्यावर महिन्याभरानंतर जाधव यांचा राजीनामा महापौर काळजे यांनी मंजूर केला होता. तर शिंदे यांनी गेल्या आठवड्यात स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपमहापौर शैलजा मोरे यांनी शिंदे यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला होता. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाLakshman Jagtapलक्ष्मण जगताप