शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कोंडी फुटणार ?

By admin | Updated: February 21, 2015 22:41 IST

गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत.

पुणे : गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने एक पाऊल मागे घेत हा सुका कचरा डेपोवर टाकण्यासाठी महापालिकेस परवानगी देण्यास ग्रामस्थांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार, उद्या ( रविवारी) सकाळी महापौरांसह महापालिकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ कचराडेपोची पाहणी करणार असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी दिली. सुका कचरा टाकण्यासाठी शहरात जागाच नसल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील कचरा उलचने महापालिका प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी आज आढावा बैठक घेतली.या बैठकीस फुरसुंगी गावच्या ग्रामस्थांसह महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर तसेच पालिका प्रशासनाकडून गेल्या दिड महिन्यात करण्यात आलेल्या उपाय-योजनांची तसेच शासनाकडे प्रलंबित प्रश्नांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच महापालिकेने अनेक मागण्यापूर्ण केल्या असून उर्वरीत मागण्या राज्यशासनाच्या अख्त्यारीतील आहेत. तसेच शहरातील कच-याची स्थिती दिवसें दिवस गंभीर होत असल्याने ग्रामस्थांनी पालिकेस सहकार्य करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या नंतर , शहराची कचरा समस्या पाहता महापालिकेस कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी अनुकुलता दर्शविली आहे. त्या नुसार, उद्या सकाळी महापौरांसह पालिका अधिकारी कचरा कँपींग करण्यासाठी जागेची पाहणी ़डेपोवर जाऊन करणार असून त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून कचरा टाकण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.वाढताहेत कच-याचे ढीग महापालिकेने कचरा उचलने बंद केल्याने शहरात कच-याचे ढीग वाढतच असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरातही प्रशासनाने सुमारे ६00 ते ७00 टन कचरा उचलला नसल्याने शहरात पडून असलेला कचरा चार ते पाच हजार टनांपर्यंत पोहचला आहे. त्यातच उद्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास नकार दिल्यास येत्या काही दिवसात संपूर्ण शहर कच-याखाली जाण्याची भिती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.