राजगुरूनगर तालुक्याचे गाव आहे. चाकण एम आय डी सी तसेच सेझ या औद्योगिक वसाहती मुळे शहर व लगतच्या उपनगरात गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे.राजगुरूनगर शहराला नगरपरिषद लागु झाल्यावर सन २०१४ पासुन लगतच्या सर्व वाड्या ,वस्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी मिळालेली नाही. यामुळे अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यातुन अनेक समस्या उद्भवत आहेत. रस्ते,कचरा,पाणी,सांडपाणी, आरोग्य यावर निर्बंध आले आहेत. याशिवाय परवानगी देण्यात येत नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडाला आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. भविष्यात या स्थितीचे अनेक दुष्परिणाम होणार असुन अधिकृत बांधकामे होण्यासाठी पीएमआरडीएकडुन रीतसर परवानगी मिळावी अशी मागणी बिल्डर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी
अध्यक्ष सुधीर मांदळे, उपाध्यक्ष दीपक घुमटकर, सांडभोरवाडीचे सरपंच अरुण थिगळे व सहकाऱ्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबचे निवेदन संघटनेच्या वतीने आमदार मोहिते पाटील यांना देण्यात आले. यावेळी सागर पाटोळे, महेंद्र पाचारणे,सुशिल शिंगवी, बबन होले,मंगेश कहाणे,कोंडीभाऊ पाचारणे आदी उपस्थित होते.
११ राजगुरुनगर
राजगुरूनगर बिल्डर असोसिएशनच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन देताना सुधीर मांदळे, अरुण थिगळे व इतर.