शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:31 IST

महामार्गावर वाहनचालकांना अडवून दरोडे टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बारामती गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बारामती - महामार्गावर वाहनचालकांना अडवून दरोडे टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बारामती गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित चौघे फरारी झाले आहेत. टोळीतील आरोपींवर खून, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जुलै २०१८ रोजी पहाटे २ च्या सुमारास सुपे-चौफुला रस्त्यावर सुपे घाटात मोकळा ट्रक निघाला होता. या वेळी तीन दुचाकींवरून आलेल्या ६ अनोळखी इसमांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन खिशातील १० हजार २०० रुपये चोरून नेले.त्याच दिवशी सकाळी ६ च्या सुमारास पुणे-सोलापूरपासून कळस रस्त्यावर टेम्पोचालक सकाळी काही कारणास्तव थांबला होता. तेव्हाही ३ दुचाकीवरून आलेल्या ६ अज्ञात चोरट्यांनी टेम्पोत झोपलेल्या क्लीनरला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल, तसेच चालकाला मारहाण करून त्याच्याकडील १ मोबाईल तसेच रोख रकमेसह २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचाºयांना सूचना दिल्या. दरम्यान, २१ जुलै रोजी पोलिसांनागुप्त बातमीदारामार्फत संबंधितगुन्हा गजानन किसन जाधव(रा. कळंब, ता. इंदापूर, जि,पुणे) याने त्याच्या साथीदारामार्फत केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून गजानन जाधव यास ताब्यात घेतले. त्याने दोन्ही गुन्हे ५ साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यानंतर ७ आॅगस्ट रोजी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काटे यांनी गुन्ह्यातीलदुसरा आरोपी चेतन पोपट सावंत(वय २१,रा. अशोकनगर, कळंब,ता. इंदापूर) यास अटक केली.अप्पर पोलीस अधीक्षक डा.ॅ पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक यादव, संदीप जाधव, शिवाजी निकम, स्वप्नील अहिवळे, संजय जगदाळे, दशरथ कोळेकर, संदीप मोकाशी, शर्मा, पवार, सुरेंद्र वाघ, संदीप कारंडे, अभिजित एकशिंगे, सदाशिव बंडगर यांनी ही कारवाई केली.वालचंदनगर पोलीस ठाणे, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.गजानन जाधव याच्यावर अकलूज पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा, कर्नाटक राज्यातील विजापूर पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.फरारी आरोपींच्या नावावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे माळशिरस, अकलूज, इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या