शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: July 6, 2017 03:35 IST

मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून १४ गुन्ह्यांतील १० लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून १४ गुन्ह्यांतील १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्वप्निल ऊर्फ नन्या अंकुश मिसाळ (वय २०, रा. ई/१ गंगा आर्चिड, पिंगळेवस्ती मुंढवा, मूळ गाव श्रीगोंदा, जि. अहमदनगर), पॉल ऊर्फ बाबा राजू जॉन (वय २०, रा. लेन नं. ७, सातफुटी रोड, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव), अक्षय ऊर्फ जंगल्या राजू भालेराव (वय २०, रा. नलावडे बिल्डिंग, महादेव आळी, दापोडी गाव), रूपेश ऊर्फ बंटी राहुल आल्हाट (वय १९, रा. टाईन रेंजहिल्स, खडकी) व विधीसंघर्षित बालक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गंगा आर्चिड मुंढवा एस. कुमार वडेवालेसमोर पार्क केलेली दुचाकी ही गंगा आर्चिडमध्येच राहणाऱ्या नन्या ऊर्फ स्वप्निल मिसाळ व त्याच्या इतर मित्रांनी चोरी केली असून, त्यांच्याकडे एक चोरीची गाडी असल्याची माहिती मिळाली.युनिट ५ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन टीम तयार करून सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर शहरातील हडपसर २, खडकी २, सांगवी १, पिंपरी १, दिघी १, कोंढवा १, स्वारगेट १, मुंढवा १, फरासखाना १ व रोहा रायगड १ असे वाहनचोरीसह मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ पानटपरी फोडी असे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १४ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून, मालकांचा शोध सुरू आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, युवराज नांद्रे, पोलीस हवालदार माणिक पवार, लक्ष्मण शिंदे, संतोष मोहिते, प्रवीण शिंदे, सचिन घोलप, प्रदीप सुर्वे, सिद्धराम कोळी, अमजद पठाण, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, प्रमोद घाडगे, राजेश रणसिंग, गणेश बाजारे, नामदेव, अंकुश जोगदंडे, संजय दळवी यांनी ही कामगिरी केली.