पाबळ येथील रुग्णांच्या नातेवाईकांना म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन पाहिजे होते. सामाजिक व इतर ग्रुपवर इंजेक्शनबाबत त्यांनी विचारपूस केली होती. पांचाळ नाव खरे की खोटे माहीत नाही, यांनी फोन करून इंजेक्शन मिळवून देतो असे सांगितले. आमच्या रुग्णांचे इंजेक्शन शिल्लक आहे. यासाठी त्याने ५० टक्के रक्कम आधी देण्याची मागणी केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहता व इंजेक्शनची गरज लक्षात घेत सुमारे साठ हजार रुपये ऑनलाईन पाठवले. परंतु दोन-तीन दिवस झाले तरी इंजेक्शन मिळाले नाही. फोन केल्यास आज-उद्या देतो असे टाळाटाळ करत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी अखेर पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला, अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम साळुंके करत आहेत.
म्युकरमायकोसिसच्या नावाखाली ६० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST