शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan: गज गवाक्ष कुंडात झाले मंडईच्या गणरायाचे विसर्जन    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 20:47 IST

Ganesh Visarjan: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष....मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर...फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला.

पुणे - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष....मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर...फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी  कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले. ( Immersion of the Ganaraya of Mandai took place in the yard)

यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर आदी उपस्थित होते. 

अण्णा थोरात म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने मंदिरातच उत्सव साजरा करण्यात आला आणि मंदिर परिसरातच विसर्जन करण्यात आले. पुणेकरांनी देखील मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी न करता उत्सव यशस्वी करण्यास सहकार्य केले, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन