शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

लोकमान्यांकडूनच गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 14:50 IST

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १८५७च्या उठावानंतर स्वातंत्र्यसमर चिरडून टाकण्याचे काम इंग्रजांनी केले.

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १८५७च्या उठावानंतर स्वातंत्र्यसमर चिरडून टाकण्याचे काम इंग्रजांनी केले. जनमानसातील विजिगिषू वृत्ती संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. स्वातंत्र्य आता इंग्रजांच्या दयेने मिळेल, असे वाटत असतानाच टिळकांनी स्वराज्याचा नारा देऊन खंडित समाजाला एकत्र आणण्यासाठी घरातल्या गणेशाला रस्त्यावर आणून विधायक स्वरूप दिले, हा धार्मिक नव्हे तर सामाजिक उत्सव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील टिळकांचे महत्त्व अधोरेखित केले.पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्यासह महापालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय समाजाला उत्साहात कार्यात सहभागी करून घ्यायचे असेल, तर उत्सव सुरू करावा लागेल, असा विचार टिळकांच्या मनात जागृत झाल्याने त्यांनी घरच्या गणपतीला रस्त्यावर आणून सार्वजनिक अधिष्ठान दिले, त्यामुळे खºया अर्थाने सामाजिक अभिसरण झाले. समाजाचे संघटन करण्याचे काम या उत्सवाने केले, असे सांगून फडणवीस म्हणाले की, हा १२५ वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा, हा आता खरा प्रश्न आहे. देश २०२२ मध्ये अमृतमहोत्सवीवर्षात पदार्पण करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत आधुनिक भारत घडविण्याचा नारा दिला आहे. जे पुण्यात पिकते ते जगभरात विकते, असे म्हणतात. त्यामुळे गणेशमंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात ‘भारत कसा असेल’ या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करावेत. टिळकांनी गणेशोत्सवात स्वराज्याचा मंत्र दिला, त्याचा उपयोग स्वराज्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.गिरीश बापट यांनी भाषणात सार्वजनिक गणेशोत्सवातील टिळकांच्या योगदानाबरोबरच भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख केला. पुण्यात स्पर्धा, वाद हे सुरूच असतात, त्याशिवाय आम्हाला करमत नाही. हे चालतच असते, असे सांगून मंडळांना कानपिचक्या दिल्या.मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले.या वेळी गणेशोत्सवाचे शुभंकर मोबाईल अ‍ॅप आणि संकेतस्थळाचे उद्घाटन झाले़ तसेच, उद्घाटन सोहळ्यानंतर अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम झाला.सामाजिक बांधिलकी जपू : महापौरलोकमान्य टिळक, खासगीवाले, बिनीवाले, पाटणकर, भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. एक राजकीय विचार घेऊन टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले. तरीही टिळकांसह सार्वजनिक गणेशोत्सवात एकत्रित आलेल्यांचे योगदानही नाकारता येत नाही. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सवातील टिळक आणि शिवराय या वादाला मी पूर्णविराम दिला आहे, अशी जाहीर स्पष्टोक्ती करून महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपू, असे आवाहन भाऊसाहेब रंगारी मंडळाला केले.कायदा पाळा,पण प्रेमानेमुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना सूचक सल्ला. कायदा पाळा, पण जरा प्रेमाने. कारण, हा एक सांस्कृतिक उत्सव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना सूचक सल्ला दिला; मात्र मंडळांना काहीही करण्याची परवानगी नाही, अशी समजही त्यांनी मंडळांना दिली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव