शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पा, मोरयाऽऽ

By admin | Updated: August 29, 2014 04:24 IST

बुद्धीच्या, क लेच्या आणि ‘जे जे सुंदर, उदात्त उन्नत’ अशा गणरायाचा उत्सव म्हणजे आनंद आणि उत्सवाला आमंत्रणच.

पुणे : बुद्धीच्या, क लेच्या आणि ‘जे जे सुंदर, उदात्त उन्नत’ अशा गणरायाचा उत्सव म्हणजे आनंद आणि उत्सवाला आमंत्रणच. आज दिवसभर शहरातल्या मध्यवर्ती बाजारपेठांतही हा आनंद गर्दीच्या रूपाने जणू ओसंडून वाहत होता. संध्याकाळनंतर मात्र पावसाने काही भागांत जोराची हजेरी लावली, तरी गणेशभक्तांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून श्रींच्या मूर्तीचे स्टॉल लागले आहेत़ शहराच्या चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविकांना खूप पर्याय उपलब्ध होते़ त्या ठिकाणी जाऊन अनेकांनी अगोदरच श्रींच्या मूर्तीचे बुकिंग केले होते़ पावसाची शक्यता लक्षात घेऊन बऱ्याच जणांनी घरातील उत्सवासाठी नेहमीपेक्षा आधीच गणेशमूर्ती आणणे पसंत केले होेते. शनिवारवाडा येथील स्टॉलवर गर्दी झाली होती़ अनेक आबालवृद्ध खास ठेवणीतला पेहराव करून श्रींची मूर्ती घेण्यास आलेले दिसत होते़ आई, वडील, आजोबांसमवेत झब्बा-कुर्ता घालून आलेल्या लहानग्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता़ मूर्ती घेऊन जाताना येणारे ‘गणपती बाप्पा’च्या जयघोषाला इतरांकडून त्यांना ‘मोरया’ असा प्रतिसाद वातावरणात जल्लोष निर्माण करत होता. या वर्षी पर्यावरणाचा विचार करून अनेक भाविक आवर्जून प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडूची मूर्ती पसंत करताना दिसत होेते. चारचाकी, दुचाकी वाहनांमधून श्रींच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण मोठे होते. या निमित्ताने अनेक घरांतील पांढऱ्या टोप्या बाहेर निघाल्या होत्या. सार्वजनिक गणपती मंडळांनी डीजेच्या दणदणाटात ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणपती नेणे पसंत केले. सजावटीकरिता प्लॅस्टिक तसेच कागदाची फुले, रंगीबेरंगी कागद वापरून केलेली तयार सजावटही लक्ष वेधून घेत होती. आरास करताना दिव्यांच्या माळा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या वेळी फुलांच्या आकारातील माळांना जास्त मागणी आहे. नेहमीच खपणाऱ्या चायनीज माळा यंदाही मोठ्या प्रमाणात बाजारात आहेतच. गणपतीचे आवडते खाद्य मोदक उद्या घराघरांत नैवेद्याला असेल. यापैकी काही जणांनी घरीच ते बनवायचे ठरवले असून, काहींनी मात्र बाहेरून मोदक, पंचखाद्य यांची आॅर्डर दिली आहे. त्यामुळे उद्या घराघरांत गोडाचा सुगंध दरवळणार हे नक्की.(प्रतिनिधी)