लोकमत न्यूज नेटवर्कमहर्षीनगर : गंगाधाम परिसर टेकड्यांच्या सान्निध्यात वसलेला असून अनेक मोठमोठे गृहप्रकल्प येथे झालेले आहेत. त्यामुळे टेकड्यांवरून नैसर्गिकरीत्या वाहणारे अनेक ओढे- नाले गायब झालेले आहेत. अस्तित्वात असलेल्या ओढ्यानाल्यांची दिशा वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन माळीणसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते.गंगाधाम चौकात आईमाता मंदिराच्या मागील बाजूने येणाऱ्या नाल्याचे अस्तित्व सुरुवातीला दिसत असून थेट गंगाधाम चौकात नाल्यांसाठी महापालिकेने कल्व्हर्टर तयार केले असून कल्व्हर्टरपासून निघालेला नाला बांधकाम व्यावसायिकाने ताब्यात घेतलेला आहे. गंगाधाम चौकातील कल्व्हर्टरपासूनचा नाला जेमतेम तीस मीटर उरलेला असून त्यावर बांधकाम व्यावसायिकाने ताबा घेतल्यामुळे नाल्याची साफसफाई करता येत नाही. नाल्यातील सांडपाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे सांडपाणी उघड्यावर वाहत आहे. उघड्यावर सोडलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गंगाधाम चौकातील ओढा झाला गायब
By admin | Updated: June 10, 2017 02:16 IST