शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जिवाशी खेळ सुरूच!

By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST

बुधवारी कोथरूडमध्ये गादी कारखान्याला लागलेली आग चार कामगारांच्या जिवावर उठली. बेकायदा बांधकामांना मिळणारे अभय, पालिका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे

पुणे : बुधवारी कोथरूडमध्ये गादी कारखान्याला लागलेली आग चार कामगारांच्या जिवावर उठली. बेकायदा बांधकामांना मिळणारे अभय, पालिका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आगीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. खरोखरीच मानवी जीवनाबाबत एवढी अनास्था का आहे? शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये झपाट्याने उभ्या राहत असलेल्या उंचच उंच इमारतींच्या फायर आॅडिटकडे होणारे दुर्लक्ष, अतिक्रमणांकडे होणारी डोळेझाक आणि अग्निप्रतिरोधक यंत्रणेच्या बाबतीतही उदासीनता यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रसंगी जिवावर उदार होऊन नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तांचे रक्षण करणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांच्याही जिवाशी एकप्रकारचा खेळच सुरू आहे. हलक्या दर्जाचे गणवेश आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.कोथरूडमध्ये ज्या ठिकाणी आग लागली होती ते पत्र्याचे शेडच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. चारही बाजूंनी बंदिस्त असलेले हे शेड पुन्हा पुन्हा कसे उभे राहते, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. शेडमधील गॅस सिलिंडरमुळे ही आग आणखीनच भडकली. वास्तविक अशाप्रकारची अतिक्रमणे रस्त्यांवर राजरोस पाहायला मिळत आहेत. चायनीज स्टॉल आणि बेकायदा उपाहारगृह तर रस्तोरस्ती झालेले आहेत. यासर्व ठिकाणांवर बेकायदा सिलिंडर वापरले जातात. त्याकडे मात्र दुर्लक्ष होते. गेल्याच महिन्यात गुलटेकडी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये एका दाम्पत्याच्या भांडणामधून आग लागली होती. घरगुती वादामधून गॅस सुरू ठेवल्यामुळे भडकलेल्या आगीत तब्बल ६६ झोपड्या जळून खाक झाल्या, तर ४० वर घरांना झळ बसली. अनेक कष्टकरी कुटुंब एकाच दिवसात रस्त्यावर आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत ही आग विझवली. त्यांना स्थानिकांनीही मोठी मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही. अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन जळीतग्रस्तांना मदत केली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या शेकडो झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. तारांचे जाळे, छोट्या अरुंद बोळा, वेडीवाकडी वायरिंग यामुळे आगीचा धोका कायमच असतो. त्यावर उपाययोजनेची आवश्यकता आहे. रिफ्युज एरियाकडे होणारी डोळेझाक, खासगी एजन्सीमार्फत चालणारे फॉर्म बी भरून घेण्याचे, तसेच अग्निप्रतिरोधक यंत्रणा तपासण्याचे काम यामुळे अडचणी वाढत आहेत. आगीच्या घटनांकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिकांच्या जीविताशी संबंधित या विषयाकडे आजही तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही.प्रतीक्षाचप्रशासनाच्या उदासीनतेमुळे यापुढे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास खूप मोठी हानी होण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाचे जवान सक्षम असले, तरीदेखील कोट्यवधींचे साहित्य धूळ खात पडून आहे. त्यामुळे कामात मर्यादा येत आहेत. मुख्य अग्निशामक अधिकाऱ्याला फायर अ‍ॅक्टनुसार फायर फायटिंग सिस्टिम न बसविणाऱ्या इमारतींना व आस्थापनांना ‘सील’ ठोकण्याचे अधिकार आहेत; परंतु अशी कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.