शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गजबजलेली अलंकापुरी झाली सुनी सुनी, तुकाराम’चा जयघोष थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:45 IST

ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

आळंदी : धन्य आज दिन संतदर्शनाचा।अनंत जन्मीचा शीण गेला ।।मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे ।कदा न सोडावे चरण त्यांचे ।।ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ‘ज्ञानोबा-माऊली, तुकारामां’चा जयघोष करीत हजारो माऊलीभक्तया मंदिर व नगरप्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर भाविकांच्या गर्दीने गजबजलेली अलंकापुरी काही तासातच सुनी सुनी झाली.गेल्या सात दिवसांपासून माऊलींचा हा संजीवन सोहळा अलंकापुरीत भक्तिमय वातावरणात सुरू होता. राज्याच्या कानाकोपºयांतून माऊलींचा संजीवन सोहळा; तसेच कार्तिकी आळंदीची यात्रा प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी अनुभवण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली होती. गुरुवारी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडला, तर शुक्रवारी (दि.१७) या सोहळ्याची छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता झाली.तत्पूर्वी, आज पहाटे तीनच्या सुमारास माऊलींची आरती, महापूजा करण्यात आली. दुधारती घेऊन सांगता दिवसाला प्रारंभ करण्यात आला. पहाटे पाचपासून भाविकांच्या नियोजित पूजा पार पडल्या. त्यानंतर दर्शनबारीतून भाविकांना ‘श्रीं’च्या दर्शनासाठी सोडण्यात आले. दुपारी बाराच्या दरम्यान माऊलींना महानैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी दर्शनबारी बंद करण्यात आली होती. रात्री आठ वाजता धुपारती घेऊन सोहळा सांगतेच्या मुख्य कार्यक्रमाला साडेनऊच्या सुमारास सुरुवात करण्यात आली.‘श्रीं’ची विधिवत महापूजा करून मानकºयांच्या साह्याने ‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल..श्रीज्ञानदेव तुकाराम..पंढरीनाथमहाराज की जय..’ असा जयघोष करून, माऊलींना पंखा मंडपातून, करंज्या मंडप, वीणामंडपात आणण्यात आले. मंदिराच्या मुख्य महाद्वारातून ‘श्रीं’चा छबिना सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. त्या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा छबिना हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. विसावा घेऊन पुन्हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. नगर परिषद चौकमार्गे आजोळ घरासमोरून विष्णू मंदिराशेजारून इंद्रायणी घाटाकडून रात्री पालखी सोहळा मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहोचला.वीणामंडपात आरती घेऊन माऊलींच्या पादुकांना शेजघरामध्ये स्थापन करून, सोहळा सांगतेची शेजारती घेऊन सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली.ज्ञानदेव ज्ञान सागरु। ज्ञानदेव ज्ञान गुरु ।।ज्ञानदेव भवसिंधु तारु। प्रत्यक्ष रूप असे ।।या ओवीप्रमाणे माऊलींच्या संजीवन समाधीनंतर ब्रह्मांडसागर भगवंत ज्ञानदेवांच्या समाधीला प्रदक्षिणा घालून पाणवलेल्या डोळ्यांनी नमस्कार करून, ‘श्रीं’चे दर्शन घेऊन पंढरपूरस्थळी रवाना झाले होते. त्याप्रमाणे आज सोहळासांगतेच्या पूर्वसंध्येला अनेक भाविक माऊलींचे व पवित्र इंद्रायणीचे अखेरचे दर्शन घेऊन अलंकापुरीला निरोप देत होते.च्दिवसभरात बहुतांशी वारकºयांनी पवित्र इंद्रायणीत स्नान करून नगरप्रदक्षिणा घातली. भाविकांच्या परतण्यामुळे गेल्या सात दिवसांपासून भाविकांनी गजबजलेला इंद्रायणीचा काठ व परिसर भाविकांअभावी अगदी सुनासुना झाला होता. माऊलींचा हा विरह आता आषाढीवारीपर्यंत भाविकांना सहन करावा लागणार आहे.