शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंत्यविधीचा निधीही हडप

By admin | Updated: November 29, 2014 00:04 IST

शहरात गरीब व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू केंद्रातून दिले जाणारे अनुदानही लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला.

सुनील राऊत ल्ल पुणो
शहरात गरीब व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी  कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू केंद्रातून दिले जाणारे अनुदानही लाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. निधी लाभाथ्र्यांर्पयत पोहोचविणो, हे सबंधित अधिका:यांचे आद्य कर्तव्य असते. मात्र, पालिकेतील कावळे याकडे काणाडोळा करीत स्वत:च अंत्यविधीचा निधी हडप करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अंत्यविधीचे अनुदान  25क् रुपयांचे आहे. मात्र,  त्याची माहितीच नसल्याने जन्म-मृत्यू केंद्रात  मृत्यू दाखला घेण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांकडून अनुदानाच्या अर्जावर बिनदक्कत सह्या घेऊन  हा निधी लाटला जात असल्याच्या तक्रारीही आहेत.  
पालिकेच्या 1995च्या ठरावानुसार  आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्ती मरण पावल्यास व्यक्तींच्या नातेवाइकांना तिचे दहन करायचे असेल तर 25क् रुपये, दफन करायचे असल्यास 15क् रुपये आणि विद्युत दहन करायचे असल्यास 6क् रुपये अनुदान दिले जाते. संबंधित व्यक्तीने आपल्या प्रभागातील नगरसेवकाचे शिफारसपत्र व अनुदानासाठीचा अर्ज दिल्यानंतर अनुदान दिले जाते. 
हडपसर-माळवाडी परिसरात राहणारे  नाना थोरात यांचा मृत्यू जुलै 2क्क्7मध्ये झाला होता.  थोरात यांचा मुलगा चैतन्य थोरात यांचा मित्र तुषार धायगुडे यांनी कोणी अनुदान घेतले आहे का, याची माहिती घेण्यासाठी  माहिती अधिकारात अर्ज केला. ही माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाकडून टाळाटाळ करण्यात आली. तुषार यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे  अपील केले. त्यानंतर जन्म-मृत्यू केंद्राकडून देण्यात आलेली माहिती धक्कादायक होती. यात नाना थोरात यांच्या मुलाला 25क् रुपयांचे अनुदान देण्यात आले असून त्यांची स्वाक्षरी करण्यात आलेली होती. याबाबत चैतन्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, वडिलांच्या निधनावेळी लहान होतो; त्यामुळे अनुदानाबाबत काहीच माहीत नव्हते. मात्र, पैसे घेतल्याचे पाहून धक्का बसल्याचे सांगितले.
 
थोरात यांच्याप्रमाणोच या अनुदानाचा विदारक अनुभव येरवड येथील 75 वर्षीय सिद्धराम कांबळे  यांनाही आला आहे. कांबळे यांचा मुलगा संतोष कांबळे याचा 2क्12मध्ये मृत्यू झाला.  अंत्यविधीसाठी जवळपास 2 हजार रुपये खर्च आला; पण जेव्हा ते मुलाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जन्म-मृत्यू विभागात गेले, तेव्हा त्यांची 25क् रुपये अनुदानाच्या मस्टरवर सही घेतली गेली. त्यांनी पैशांबाबत विचारले असता दोन दिवसांनंतर या, असे सांगण्यात आले. अशा पद्धतीने सिद्धराम कांबळे यांनी तब्बल चार वेळा चकरा मारल्या तेव्हा कुठे वैतागून कर्मचा:यांनी त्यांच्या हातावर शंभर रुपये टेकवण्यात आले. 
 
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील व्यक्तींच्या नातेवाइकांना महापालिकेच्या 1995च्या ठरावानुसार, व्यक्ती मृत झाल्यास तिचे दहन करायचे असेल तर 25क् रुपये, दफन करायचे असल्यास 15क् रुपये आणि विद्युत दहन करायचे असल्यास 6क् रुपये अनुदान दिले जाते. 
 
वर्ष  दहन  विद्युत दाहिनी  दफन 
2क्क्821क्33
2क्क्92क्372
2क्1क्166क्क्
2क्11851क्
2क्125क्11
2क्135111
 
या प्रकाराबाबत आरोग्य विभागाकडे संबधितांनी तक्रार केल्यानंतर अनुदान देण्याच्या पद्धतीत बदल केला गेला आहे. यापूर्वी कोणतेही पुरावे न घेता, तसेच शहानिशा न करता, हे अनुदान देण्यात येत होते. ही जबाबदारी कसबा-विश्रमबागवाडा येथील जन्म-मृत्यू केंद्राकडे होती.  आता त्यात बदल करण्यात आला आहे. अनुदान देताना संपर्क क्रमांक, तसेच फोटो ओळखपत्रचा पुरावा घेण्यात येतो. तसेच, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी लवकरच त्याचे संगणकीकरणही कररण्यात येणार आहे.
- डॉ. एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्यप्रमुख