शनिवार (२७ मार्च ) रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह पौड परिसरात गस्त घालत होते. यावेळी दहशतवाद विरोधी कक्षाचे मोसिन शेख यांना पिरंगुट येथे शाळेजवळ एक इसम आला आहे. तो कोणता तरी गुन्हा करून फरार आहे, अशी माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता अंकुश जाधव याने १९९९ मध्ये आपल्या बायकोचा खून केला व तो फरार झाला होता. त्याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, राजेश पवार, हवालदार राजेंद्र मिरगे, अब्दुल शेख, ईश्वर जाधव, विशाल भोरडे, महेंद्र कोरवी, किरण कुसाळकर, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे मंगेश भगत व अमोल शेडगे या पथकाने ही कारवाई केली.
पत्नीचा २१ वर्षांपूर्वी खून करून फरारी पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST