शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषदेसाठी मोर्चेबांधणी; परिषदेच्या पुणे शाखेच्या पदाधिका-यांचे ‘नाटकवाले’ पँनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 04:56 IST

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पॅनल तयार केले आहे.

पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पॅनल तयार केले आहे. पुण्यातच नाट्य परिषदेच्या दोन स्वतंत्र शाखा असल्याने परिषदेच्या कोथरूड शाखेच्या अध्यक्षांनी मात्र पुणे जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्याला नाट्य परिषद पुणे शाखेकडून प्रतिसाद मिळणार का? हा प्रश्न आहे.नाट््य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. राज्यातील १९ जिल्ह्यांतून जवळपास १९३ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई (३८), मुंबई उपनगर (१७), ठाणे (५), लातूर (१), उस्मानाबाद (२), रत्नागिरी (५), कोल्हापूर (५), सांगली (१०), सोलापूर (१३), पुणे (२३), नाशिक (९), अहमदनगर (१३), जळगाव (५), नागपूर (१९), नांदेड (६), अकोला (५), वाशिम (९), बेळगाव (४) आणि बीड (३) या ठिकाणाहून उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये नाट्य परिषदेच्या विद्यमान शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांचाही समावेश आहे. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनीही अर्ज भरले आहेत. या दोघांसह योगेश सोमण, भाग्यश्री देसाई, विजय पटवर्धन, विनोद खेडकर, प्रमोद रणनवरे आणि प्रशांत कांबळे यांनी ‘नाटकवाले’ नावाचे पॅनल तयार केले आहे. कोथरूड शाखेकडून मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.मागच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे नाट्य परिषदेकडून घटनेत दुरुस्ती करण्यात आली आहे. पूर्वी विभागवार निवडणुका घेतल्या जायच्या, त्यात पश्चिम महाराष्ट्रांतर्गत सांगली, सातारा, कºहाड, इचलकरंजी आणि पुण्याचा समावेश होता. मात्र आता नवीन घटनेनुसार ३00 शाखांचे सभासद असतील, त्यातला एक प्रतिनिधी परिषदेच्या नियामक मंडळावर घेतला जाणार आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यासाठी सात जागा आहेत. त्यात पुणे, बारामती, तळेगाव, पिंपरी चिंचवड, कोथरूड आणि दौंड या सात शाखांचा समावेश आहे. राज्यात एकूण २३, ४५0 मतदार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी २२ जानेवारीला जाहीर होईल.मतदान केंद्रावरच जाऊन मतदान करावे लागणारनाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार आता मतदारांना बॅलेट पत्रिकेद्वारे मतदान न करता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. जिल्ह्यातील शाखांच्या सदस्यांसाठी मतदान केंद्राचे ठिकाण संबंधित शाखेत तसेच नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर दि. ३१ जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहे. दि. ४ मार्च रोजी मतदानप्रक्रिया राबविली जाणार असून, दि. ७ मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली.परिषदेचे काम काय?निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी ‘नाटकवाले’ या पॅनलच्या माध्यमातून परिषदेचे नक्की काम काय आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील नाट्य संकुल चालवणे एवढेच परिषदेचे कार्य आहे का? मुंबई सोडून महाराष्ट्रभर पसरलेल्या परिषदेच्या शाखा आणि त्यातील आजीव सदस्यांसाठी परिषद काय करते याचा विचार करण्याची गरज आहे. या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांनी नाट्य परिषदेच्या कार्याचा मूळ ढाचाच बदलावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पुणे जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा आहे. उगाच खर्च कशाला करायचा? आमच्या काही लोकांनी अर्ज भरले आहेत. मात्र पॅनल वगैरे अजूनतरी केलेले नाही. अर्जांची छाननी झाल्यानंतर पाहू.- सुनील महाजन,अध्यक्ष कोथरूड नाट्य परिषद

टॅग्स :Puneपुणे