पुणे : शहरात शुक्रवारी २५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ६८५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़ ६५ टक्के इतकी आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ३११ इतकी आहे़ आज दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०६ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणा-यांची संख्या २८२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख १ हजार ७५६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९४ हजार ७२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८३ हजार ५०६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला आहे.